नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.यानुसार महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला (बुधवारी) विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल,मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.
राज्यात 22 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.तर 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. 30 ऑक्टोबर अर्ज छाणणी आणि 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात ९ कोटी ३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार-
महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. याठिकाणी २८८ मतदारसंघ आहेत. १ लाख १५८ मतदार निवडणूक केंद्र आहेत. यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र आहेत. तर एकूण ९ कोटी ३ लाख मतदार आहेत. यापैकी ४ कोटी ९३ लाख पुरुष तसेच ४ कोटी ६० लाख महिला मतदार आहेत. एकूण मतदारसंघ २८८ आहेत. त्यापैकी २५ अनुसूचित जाती तर २९ अनुसूचित जमीतीसाठी राखीव आहेत.मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी घरुन मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.