Published On : Tue, Jan 15th, 2019

लेझिंम,ढोल ताशा आणि पुष्पवर्षावाच्या जल्लोषात नागपूरकराद्वारे माझी मेट्रोचे स्वागत

धावणार माझी मेट्रोमुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह

नागपूर : महा मेट्रो नागपूरच्या प्रकल्पांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरु करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. चेन्नई येथून निघालेले माझी मेट्रो कोचेस आज दिनांक १५.०१.२०१९ रोजी सकाळी १०.०० वाजताच्या सुमारास नागपूरला पोहोचले. माझी मेट्रोचे शहरात झालेले आगमन पाहून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. खापरी उड्डाणपूलाजवळ ट्रेलर पोहोचताच लेझिंम, ढोल ताश्याच्या मिरवणुकीत मेट्रो कोचेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. डाऊन टाऊन झोनच्या रोटरी क्लबद्वारे विधिवत समारंभपूर्वक या गाड्यांचे स्वागत करण्यात आले.

दहा दिवसाच्या कठीण प्रवासानंतर शहरात आगमन झालेल्या माझी मेट्रोच्या कोचेसची नागपूरकरांना असलेली प्रतीक्षा आज संपली. आज मकरसंक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर ही आनंदवार्ता नागपूरकरांना मिळाली आणि त्यांचा आनंद द्विगुणित झाला आणि शहरभरातून नागरिकांची मेट्रो कोचला बघण्याकरिता एकच गर्दी झाली. यावेळी नागपूरकरांनी मेट्रोच्या कोचेस्चे स्वागत फुलांचा वर्षाव करून हर्षोल्हासात केले. यावेळी ड्रोनद्वारे या कार्यक्रमाचे छायाचित्रण देखील करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात नागरिकांनीही सहभाग घेतला. प्रस्तुत रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनीही हा क्षण मोबाईल कॅमेरामध्ये टिपला.


चेन्नैहून नागपुरात आगमन केलेल्या ट्रेलरला वर्धा मार्गावरील सर्विस रोड येथून नागरिकांच्या समवेत मिहान डेपोपर्यंत नेण्यात आले. मेट्रोच्या मिहान डिपो येथे या कोचेस्ची असेम्बलिंग करण्यात येणार असून टी धावण्यासाठी सज्ज करण्यात येणार आहे. सदर कोचेस हे चीनमधील दालीयान येथून समुद्री मार्गाने भारतात चेन्नैच्या बंदरावर आणण्यात आले. दालीयान येथून ते १५ डिसेंबर येथून निघाले व ५ जानेवारी २०१९ रोजी चेन्नई येथे पोहोचले. कोचेसला चेन्नई येथून ट्रांस्पोर्ट कंपणी प्रोकैम लॉजिस्टिकच्या माध्यमाने ०६ जानेवारीच्या रात्री रवाना करण्यात आले. हे ट्रेलर आज दहा दिवसाच्या महत्प्रयासाने प्रवास करत नागपूरला पोचले. मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता ट्रिपल कव्हर ने पैकिंग करून १५ कर्मचाऱ्यांची चमू ने कोच ला नागपूर येथे आण्यास परिश्रम घेतले.

ट्रेलर ची गति २० ते ३० किलोमीटर प्रतिघंटा होती. एका ट्रेलर वर एक मेट्रो कोच अश्या प्रकारे ३ अवाढव्या ट्रेलर हे कोचेस ठेवण्यात आले होते. या कोचेसची वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने फक्त रात्री करण्यात आली. या कोच मध्ये २ व्याकुम सर्किट ब्रेकर्स आहे ज्याने याची विश्वसनीयता मध्ये वाढ होते तसेच या गाडी मध्ये ईथरनेट बेस्ड ट्रेन कंट्रोल आणि मॅनेजमेंट सिस्टम आहे ज्याने सुरक्षा आणि विश्वसनीयता मध्ये वाढ होईल.

याशिवाय सुरक्षा, डिझाईन, मेट्रोच्या आतील फिचर हे अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त असून आता लवकरच शहरामध्ये मेट्रो धावण्यास सज्ज झाले आहे. या कोचेसमध्ये लहान मुलांसह महिला आणि वृद्धांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा आहे. तसेच आंतरिक कलाकृती, एलईडी बल्ब, आपातकालीन दरवाजे, एलईडी आधारित मार्ग दर्शिका, स्वचलित घोषणा प्रणाली, निसर्गाच्या थीम वर आधारित मेट्रो कोचेसवर आकारण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी महा मेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) श्री. नरेंद्र उपाध्याय, उपमहाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) श्री. रमण, रोटरी व्लब नागपूर डाऊन टाऊन चे पदाधिकारी श्री. निशिकांत काशीकर, स्नेहल काशीकर, पंकज दहीकर, संदीप हटेवार, अपूर्व नायक, मंथन पटले, सुरेश लांगे व नागपूर सायकलिंग ग्रुप चे नीतू काटेर, प्रियंका देवासे, सोनल बरबटकर यावेळी उपस्थित होते.