Advertisement
सिंधुदुर्ग/मुंबई: नारायण राणे यांनी अखेर कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीसह सर्वच ज्येष्ठ नेत्यांवर जोरदार तोफ डागली. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेला भविष्यातील वाटचाल स्पष्ट करणार, असे नारायण राणे यांनी सोमवारी सांगितले होते. त्यामुळे आज (गुरुवारी) राणे काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. दोन वाजता सोनिया गांधींना पत्र पाठवलं आणि 2 वाजून 35 मिनिटांनी सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला असं राणे म्हणाले.