Published On : Sat, Mar 9th, 2019

तिकीट घेऊन नागपूरकरांनी केला मेट्रो चा प्रवास

नागपूर : महा मेट्रो नागपूर द्वारे काल साजरा करण्यात आलेल्या आभार दिवसाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसद मिळाल्या नंतर आज देखील तोच उत्साह पुनः बघायला मिळाले, सकाळी ७ वाजता पासून प्रवासी नागरिकांची गर्दी मुंजे चौक इंटरचेंज मेट्रो स्टेशन, एयरपोर्ट मेट्रो स्टेशन, साउथ एयरपोर्ट मेट्रो स्टेशन, न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि खापरी मेट्रो स्टेशन या ठिकाणी जमा झाली होती.

आज दिनांक दिनांक ०९ मार्च रोजी मेट्रोच्या विनामूल्य तिकीट खरीदी करून प्रवासी नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला. मोफत तिकीट घेऊन ए.एफ.सी. प्रणालीने प्रवाश्यांना प्लॅटफ़ॉर्म’वर प्रवेश केला व प्रवास पूर्ण झाल्यानंतर ए.एफ.सी. गेटच्या बाहेर निघाल्यानंतर पुन्हा मेट्रोने प्रवास करण्यासाठी दुसऱ्यांदा विनामूल्य पुनः तिकीट नागरिकांनी तिकीट काउंटर वर प्राप्त केली. मेट्रो प्रवासासाठी संपूर्ण कार्यप्रणाली नागरिकांना समजता यावी यासाठी विनामूल्य तिकीट संकल्पना अमलात आनण्यात आली होती. पहिल्या दिवशीच तब्बल ११ हजार प्रवाश्यांनी मेट्रोने प्रवास केल्या नंतर तोच उत्साह परत आज मेट्रो स्टेशन वर बघायला मिळाला आज १२५०० नागरिकांनी मेट्रोचा प्रवास अनुभवला.

मेट्रो प्रवाश्यांच्या प्रतिक्रिया:

*श्रीमती शोभना बंडोपाध्याय, विभागीय अधिकारी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे:* शहरात मेट्रोची प्रवासी सेवा सुरु झाल्याने शहराच्या विकासात नक्कीच भर पडेल. आज पहिल्यांदा नागपूर मेट्रोतून प्रवास करतांना फार आनंद होत आहे. मेट्रोचे सर्व स्टेशन दिसायला आकर्षक आहे.

*चंद्रकांत लोंढे:* महा मेट्रोने दिव्यांग नागरिकांच्या प्रवासासाठी मेट्रोत उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मी दिव्यांग असून मला मेट्रोत चढताना व उतरताना कोणताही त्रास सहन करावा लागला नाही. अतिशय आरामात मला मेट्रोने प्रवास करता आला. नागपूर मेट्रोच्या पुढच्या प्रवासासाठी माझ्यातर्फे शुभेच्या…

तुषार पाटील: नागपूर मेट्रो ने प्रवास करतांना एक वेगळा सार्वजनिक वाहतुकीचा अनुभव बघायला मिळाला.मेट्रोचे शहरात आगमना झाल्यापासून एक नवीन नागपूर बघायला मिळत आहे.

स्मृती चोबीतकार: नागपूर मेट्रोचा प्रवास आम्हा विद्यर्