| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jun 14th, 2019

  महा मेट्रो द्वारे सिताबर्डी इंटरचेंज ते झिरो माईल स्टेशन दरम्यान लोड परीक्षण

  ३४० टन वजन ठेऊन केले परीक्षण

  नागपूर : महा मेट्रो,नागपूर द्वारे सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन ते झिरो माईल मेट्रो स्टेशन दरम्यानच्या ट्रॅक वर लोड परीक्षण घेण्यात आले. सदर कार्याचे प्राथमिक परीक्षण हे ४३ मी. स्टील कंपोझिट गर्डर येथे १०० टन इतक्या रेतीच्या बॅग दोन्ही ट्रेन मध्ये ठेवण्यात आल्या होत्या. तसेच २४० टन एवढ्या वजनाच्या रेतीच्या बॅग ट्रॅक वर ठेवून ठरविण्यात आलेल्या संरचना आणि डिजाईनची स्थिरतेच्या मापदंडानुसार तपासल्या गेले. ज्यावर मेट्रो ट्रेनचे संचालन होणार. गाडीच्या आता ट्रक वर ठेवलेल्या एकूण रेतीच्या पोत्यांचे वजन ३४० टन एवढे होते.

  मागील आठवड्यात ४ जून रोजी सिताबर्डी इंटरचेंज ते झिरो माईल मेट्रो स्टेशन दरम्यान घेण्यात आले होते. त्यावेळेस मेट्रो ट्रेनचे संचालन क्रॉस ओव्हर पर्यंत करण्यात आले होते ;म्हणजे डाउन मार्गाने जाणाऱ्या ट्रेनने अप मार्गावर प्रवास केला होता. आज झालेल्या परीक्षणा नंतर आणखी एक पाऊल पुढे टाकत हे निश्चित झाले की लवकरच अप आणि डाऊन ट्रॅक वर मेट्रोचा प्रवास सुरु होणार आहे.

  सदर मेट्रो ट्रेनचे परीक्षण हे शहीद गोवारी उड्डाण पूलच्या वर तयार करण्यात आलेल्या वर स्टील कंपोझिट गर्डर येथे करण्यात आले.ज्यामध्ये २ ट्रेन ट्रॅकवर आजू-बाजूला उभ्या होत्या जे उड्डाणपूलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांकरिता कौतूहालाचा विषय ठरला. महा मेट्रो तर्फे घेण्यात आलेल्या लोड परीक्षणाचे परिणाम समाधान असून सर्व निकषावर आढळून आले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145