Published On : Sat, Aug 13th, 2022

स्वातंत्र्याच्या विरोधात कुठलेही कार्य करणार नाही हा संकल्प घ्यावा: डॉ. दीक्षित

Advertisement

•मेट्रो स्थानकावर स्वतंत्रता सेनानींचा सत्कार समारोह

नागपुर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य आपण सर्वानी देशाच्या प्रगति आणि सर्वांगीण विकासाकरिता मिळून कार्य करणार आणि स्वातंत्र्या विरुद्ध कुठलेही कार्य करणार नाही हा संकल्प घ्यावा असे प्रतिपादन महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केले. अमृत महोत्सवानिमित्य सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथे स्वतंत्रता सेनानीचा सत्कार समारोह कार्यक्रम मध्ये उपस्थितांना डॉ. दीक्षित संबोधित करत होते.

स्वतंत्रता सेनानीमध्ये श्री. शेषराव मुरकुटे, श्री. बसंतकुमार चौरसिया, श्री. महादेव कामड़ी उपस्थित होते. तसेच महा मेट्रोच्या वतीने संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) श्री.अनिल कोकाटे, कार्यकारी संचालक (ऑपरेशनअण्ड मेंटेनस) श्री. उदय बोरवणकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. दीक्षित यांनी सांगितले कि आजचा दिवस हा आमच्या करता अत्यंत सौभाग्याचा दिवस आहे देशाला स्वतंत्रता मिळून देणारे सेनानी आज आपल्या मध्ये उपस्थित आहे. देशाप्रति समर्पित सेनानीमुळे आज आपण आजादी का अमृत महोत्सव हा दिवस उत्साहाने साजरा करू शकत आहे.

त्यांनी सांगितले कि ७५ वर्षाचा मध्ये देशाने जी प्रगती केली आहे त्याला आणखी पुढे घेऊन जायचे आहे. मेट्रो प्रति बोलतांना त्यांनी सांगितले कि, मेट्रो सेवेचे निर्माण कार्य १०० वर्षा करिता करण्यात आले आहेत. मेट्रो स्टेशन परिसरात आयोजित प्रदर्शनी दर्शकाकरिता ऊर्जास्त्रोत होण्याच्या त्यांनी उल्लेख केला. सदर प्रदर्शनी अंदाजे एक लाख नागरिक बघणार आणि नागरिकांना प्रदर्शनीमुळे एक नवी दिशा आणि चेतना मिळेल.

डॉ. दीक्षित यांनी उपस्थितांना देशाच्या प्रगति करिता हार्दिक शुभेच्छा दिल्या. स्वतंत्रता सेनानीच्या सत्कार समारोहाचे आयोजन उन्नति फाउंडेशनच्या माध्यमाने आयोजित करण्यात आला होता. प्रस्ताविक भाषण फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. अतुल कोटेचा यांनी केले.

•मेट्रो ने इच्छा पूर्ण केली….
नागपूरच्या बदलत्या स्वरूपाची माहिती घरी चर्चा मध्ये अनेकदा ऐकायला मिळत होत्या मेट्रो शहरात आली असून, कुठे कुठे काय बनत आहे ? हे बघण्याची ईच्छा मनात होती जी कि आज पूर्ण झाली. वयोवृद्ध असल्याच्या कारणाने घरातून बाहेर निघण्याची हिम्मत होत नाही परंतु आज मेट्रो परिवाराने आमची नागपूरची मेट्रो ट्रेन मध्ये बसून प्रवास करण्याची ईच्छा पूर्ण केली.

मेट्रोच्या वतीने सेनानी ना सिताबर्डी ते कस्तूरचंद पार्क आणि खापरी तसेच परतीचा प्रवास मेट्रो ने करण्यात आली. सेनानी ने सांगितले कि देशात सर्वात चांगली आपली मेट्रो आहे. सेनानी ने मेट्रोचे निर्माण कार्याकरिता महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांचे आभार मानले आणि त्यांना आशिर्वाद दिला.

•चित्रकला स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी
अमृत महोत्सव वर्षानिमित्य महा मेट्रोच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून झिरो माइल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला.

•देशभक्ति संगीतावर नागरिक उत्साहित
झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन परिसर येथे सीआरपीएफ बैंड पथका ने देशभक्ति गीतांचे संगीत प्रस्तुत करून राष्ट्रप्रेमची भावना जागृत केली.