Published On : Thu, May 24th, 2018

सुन्नी नूरी मस्जिद येथील इफ्तारला राज्यपालांची हजेरी

मुंबई: राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी बुधवारी (दिनांक २३) वांद्रे पश्चिम येथील सुन्नी नूरी मशिद येथे पवित्र रमजाननिमित्त आयोजित इफ्तारला भेट देऊन उपस्थितांसोबत प्रार्थना केली तसेच अल्पोपहार घेतला.

सुन्नी नूरी मस्जिदचे अध्यक्ष – विश्वस्त मोहम्मद फारूक सुलेमान दरवेश, झकरिया मोहम्मद फारूक दरवेश तसेच मुस्लीम बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.