Published On : Sat, Apr 14th, 2018

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी वाहिली आदरांजली

Advertisement

Vidyasagar Rao in Chaityabhumi
मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. यावेळी शिक्षण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, भाई गिरकर उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चैत्यभूमी येथे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांनी चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस वंदन करून प्रार्थना केली. महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्र प्रदर्शनासही यावेळी त्यांनी भेट दिली.


उपस्थित मान्यवरांना यावेळी लोकराज्य अंकांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक समितीचे सचिव नागसेन कांबळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्मारक समितीचे अध्यक्ष महेंद्र साळवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Gold Rate
25 April 2025
Gold 24 KT 96,300 /-
Gold 22 KT 89,600 /-
Silver / Kg 97,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement