Published On : Tue, Feb 20th, 2018

मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 : ऊर्जा विभागाची विभागाशी विविध कंपन्यांचा 1,60,268 कोटींचा सामंजस्य करार

Advertisement


नागपुर: महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आयोजित केलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 या भव्य प्रदर्शनात देशातील विविध ऊर्जा कंपन्यांनी ऊर्जा विभागाशी 1 लाख 60 हजार 268 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहे. या करारामुळे 2024 पर्यंत सुमारे 30 हजार तरुणांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने एक हजार मेवॉ. सौर ऊर्जेसाठी 7 हजार कोटीचा सामंजस्य करार तर आठ हजार कोटींचा खाणीसंबंधी करार करण्यात आला. अदानी ट्रान्समिशन लिमिटेडने 5 हजार कोटींचा तसेच 765 के.व्ही. डीसी ट्रान्ममिशन लाईनसाठी करार केला. रिन्यू पॉवर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने सोलर, पवन व टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा निर्मितीसाठी 14 हजार कोटींचा सामंजस्य करार केला. टाटा पॉवर कंपनीने 1320 औष्णिक ऊर्जा निर्मिती, अपारंपरिक ऊर्जा निर्मिती, ईव्ही चार्जिंग स्टेशन आदींसाठी सुमारे 15 हजार 500 कोटींचा सामंजस्य करार केला.

याच प्रदर्शनात सॉफ्ट बँक एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सोलर ऊर्जा व बॅटरीजसाठी 23500 कोटी रूपयांच्या प्रकल्पासाठी सामंजस्य करार केला आहे. युनिव्हर्जी थिंक ग्रीन प्रायवेट लिमिटेड सुमारे 24 हजार कोटी रूपयांचा करार केला आहे. टोरंट पॉवर लिमिटेडने गॅसवर आधारित प्रकल्प, पवन ऊर्जा निर्मिती, वीज वितरण, सौर ऊर्जा निर्मिती, वीज वितरण जाळे मजबुतीकरण या प्रकल्पांसाठी सुमारे 11 हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला आहे.

टेक फेडरल इंटरनॅशनल जनरल ट्रेडिंग कंपनीने एक हजार मेवॉ चा तरंगता सौर ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पासाठी 6500 कोटी रुपये गुंतवणूकीचा करार केला आहे. वॉरी इंजिनीयर्स लि ने 1000 मेवॅ चा सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 5000 मेवॅ प्रकल्पासाठी 5000 कोटी गुंतवणूकीची तयारी दर्शविली आहे तसेच गिरीराज रिनिवेबल प्रा लि ने 200 मेवॅ तरंगता ऊर्जा प्रकल्प मुंबईसाठी व 100 मेवॅ तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प नागपूरसाठी 2100 कोटी रु ची गुंतवणूक करण्याचा सामंजस्य करार केला. पॅरामाऊंट सोलर पॉवर प्रा लि ने 100 मेवॅ च्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी 500 कोटी रुपये गुंतवणूकीचा करार केला आहे.

महानिर्मितीने पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा निर्मिती, जुन्या ऊर्जा निर्मिती संचाची दुरूस्ती, कोळसा खाणी विकास आदींसाठी 13 हजार कोटीची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच नागपूर जिल्हयातील उमरेड तालुक्यात 800 मेवॅ औष्णीक निर्मितीसाठी 5200 कोटी रु गुंतवणूकीकरीता सामंजस्य करार केला आहे.

महावितरणने विविध प्रकल्पांच्या विकासासाठी 200 मेवॅ सौर ऊर्जा निर्मिती 1800 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला आहे तर महापारेषणने वीज उपकेंद्रे, पारेषण वाहिन्या, देखभाल दुरूस्तीचे प्रकल्प म्हणून 8000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. या सर्व कंपन्यांची गुंतवणूक व सामंजस्य करार हा 2018 ते 2024 पर्यंत होणाऱ्या प्रकल्पांसाठी आहे.