Published On : Thu, Jun 29th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मध्यप्रदेशच्या महिलेसोबत सामूहिक बलात्कार ; दोघांना अटक

Advertisement

नागपूर : मध्य प्रदेशातून नागपुरात आलेल्या महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला 32 वर्षांची असून ती मध्य प्रदेशची रहिवासी असून तिला दोन मुलेही आहेत. तसेच तिचा तिच्या नवऱ्याशी घटस्फोट झाल्याची माहिती आहे. हिला आणि मुख्य आरोपी पिंटू गजभियेची ओळख 3 वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून झाली होती, आरोपी नागपूरचा रहिवासी असून तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. आरोपीने अनेकदा पीडित महिलेला आर्थिक मदत केली. तिला विश्वासात घेतल्यानंतर त्याने तिला नागपुरात बोलाविले.

रविवारी रात्री दहाच्या सुमारास ही महिला मध्य प्रदेश बसस्थानकावर पोहोचली. त्याठिकाणाहून एका कार चालकाने महिलेला कारमध्ये बसवून नागपूरच्या ग्रामीण भागात नेले, त्यावेळी पिंटू गजभिये आणि त्याचा सहकारी कार्तिक चौधरी यांनी महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेला पुन्हा सीताबर्डीत सोडण्यात आले.

पीडित महिलेने आपल्यासोबत घडलेल्या या अमानुष घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली आणि पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला, पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या 2 आरोपींना अटक केली आहे, मात्र आरोपी महिलेला ज्या कारमधून घेऊन गेला होता. तो कार चालक फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.