Published On : Mon, Jan 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

LPG Price Today: एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात

Advertisement

नवीन वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करून सर्वसामान्य नागरिकांना मोठी भेट दिली असून आजपासून म्हणजे १ जानेवारीपासून पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर लागू केले आहेत.

मुंबई : कच्च्या तेल आणि गॅसच्या किमतीतील चढउतारांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या सुरवातीला LPG सिलिंडरच्या किमतीत कपात करून ग्राहकांना नवीन वर्षांचे गिफ्ट दिले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने १९ किलो गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. मात्र, स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी आज, १ जानेवारी २०२४ पासून LPG गॅस सिलिंडरच्या नवीन किमती सुधारित केल्या आहेत.

आज, १ जानेवारी २०२४ पासून एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला असून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे तर घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. अशाप्रकारे मिठाईची दुकाने आणि लग्नसमारंभात वापरला जाणारा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आजपासून स्वस्त झाला असून सरकारी तेल कंपनीने गॅस सिलिंडरच्या किमती किंचित कमी केल्या आहेत.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सरकारकडून नवीन वर्षाची भेट
नवीन वर्षाच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा एकदा कमी झाल्या असून काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक गॅसच्या दरात कपात करण्यात आलो होती. तेल विपणन कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार, दिल्ली ते पाटणापर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत किंचित घट झाली आहे. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती केवळ १.५ रुपयांनी कमी झाल्या आहेत. अशा प्रकारे, नवीन दरानुसार मुंबईत १७१० रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आजपासून १७०८.५० रुपयांना मिळणार आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या असून घरगुती गॅस सिलिंडरच्या ग्राहकांनाकोणताही दिलासा मिळाला नाही. देशभर ३० ऑगस्ट २०२३ च्या दराने घरगुती सिलिंडरची विक्री होत आहे. सध्या दिल्लीत घरगुती सिलिंडर ९०३ रुपयांना उपलब्ध आहे. तर इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, घरगुती सिलिंडरच्या दरांमध्ये शेवटची मोठी कपात २० ऑगस्ट २०२३ रोजी झाली होती आणि सिलिंडरच्या किमती ११०३ रुपयांवरून ९०३ रुपयांवर म्हणजे तब्बल २०० रुपयांनी स्वस्त झाला होता. आज घरगुती सिलिंडरची किंमत मुंबईत ९०२.५० रुपये आहे.

Advertisement
Advertisement