Published On : Thu, Jun 1st, 2023
By Nagpur Today Nagpur News

‘लव्ह ट्रायंगल’; हुडकेश्वरमध्ये एका युवकावर चाकूने हल्ला

Advertisement

नागपूर : प्रेयसीचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळताच पहिल्या प्रियकराने तिला दिलेल्या भेट वस्तू मागितल्या . मात्र याचा राग प्रेयसीच्या दुसऱ्या प्रियकराला आल्याने त्याचे पाहिल्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना हुडकेश्वर पोलिस हद्दीतील दिघोरी चौकातील उड्डाणपुलाखाली मंगळवारी (ता.३०) रात्री घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

स्नेहल रंजन घोडेस्वार (वय ३८ रा. न्यू शंकरनगर ,दिघोरी नाका) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याने सचिन बाबूदास महंत (वय ३० रा. तरोडी वाठोडा) याच्यावर हल्ला करून जखमी केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन महंत हा धरमपेठेतील गॅरेजमध्ये काम करतो.

एक महिन्यापूर्वी सचिनने प्रेयसीला नवीन मोबाइल दिला. दरम्यान करिष्माने सचिनसोबतचे संबंध संपुष्टात आणले. त्यानंतर ती स्नेहलच्या संपर्कात आली. ही बाब सचिनला माहिती झाली. त्याने साधनाशी संपर्क साधून तिला दिलेला मोबाईल परत मागितला.तिने त्याला दिघोरी चौकात भेटून मोबाईल घेऊन जाण्यास सांगितले.

रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास महंत तेथे गेला असता त्यांनी घोडेस्वार यांना तिच्यासोबत पाहिले. महंत आणि महिलेमध्ये वाद झाला. यादरम्यान घोडेस्वारने चाकू काढला आणि त्याच्यावर वार केले. पोटाला गंभीर दुखापत झाल्याने महंत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हुडकेश्वर पोलिसांनी पीडितेचे जबाब नोंदवून भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून घोडेस्वारला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.