जवळचा मित्र गमावला : नितीन गडकरी
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, प्रसिध्द उद्योजक, लघु उद्योग भारतीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, संस्कार भारतीचे माजी महामंत्री तसेच व्हीएनआयटीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार यांच्या निधनामुळे मी माझा एक जवळचा मित्र गमावला असल्याची भावना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.
विविध संस्थांचे ते पदाधिकारी राहिले आहेत. अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध राहिला आहे. व्हीएनआयटीचे कार्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. विविध जबाबदार्या सांभाळताना प्रत्येक कार्यात त्यांनी आदर्श निर्माण केला होता, असेही ना. गडकरी म्हणाले.