Published On : Fri, Mar 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘महाज्योती’च्या योजना राबविण्यात दिरंगाईने विद्यार्थ्यांचे नुकसान

आमदार डॉ. परिणय फुके यांनी वेधले लक्ष : दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
Advertisement

मुंबई : महात्मा जोतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजनांमध्ये झालेल्या दिरंगाईमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. गेल्या सहा महिन्यांपासून या प्रशिक्षण प्रक्रियेत विलंब झाला. सुमारे 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही तो खर्च न करता अधिकाऱ्यांनी दिरंगाईचा कळस गाठला. या विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत केली.

विधान परिषदेत आमदार डॉ. परिणय फुके यांनी शुक्रवारी लक्षवेधी सूचनेद्वारे विद्यार्थ्यांचे नुकसान व ‘महाज्योती’तील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला. महाज्योती संस्थेमार्फत आयबीपीएस, रेल्वे, कर्मचारी निवड आयोग, मिलिटरी, पोलीस भरती, एमबीए-सीईटी तसेच नेट-सेट अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या प्रशिक्षण प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे डॉ. परिणय फुके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाज्योती संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी 49 हजार 358 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले, मात्र अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच ऑगस्ट 2025 मध्ये महा-ई-टेंडर प्रणालीद्वारे नामांकित प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या प्रक्रियेला सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही निविदा अंतिम न झाल्याने प्रशिक्षण सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेता आले नाही, याकडे डॉ. परिणय फुके यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, 11 सप्टेंबर 2025 रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ‘महाज्योती’साठी 300 कोटी रुपयांच्या योजना मंजूर करण्यात आल्या होत्या.

तसेच सन 2025-26 या आर्थिक वर्षात 299 कोटी रुपये आणि मागील प्रलंबित 200 कोटी रुपये असा एकूण सुमारे 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु हा निधीही खर्च न करण्यात आला नाही. तसेच प्रशिक्षण प्रक्रिया रखडण्यामागे प्रशासकीय उदासीनता असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाज्योतीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणीही डॉ. परिणय फुके यांनी यावेळी केली.

Advertisement

चौकशी करून दोषींवर कारवाईचे मंत्र्यांचे आश्वासन

या प्रश्नावर उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी सांगितले की, महाज्योती संस्थेमधील प्रशिक्षण योजना, निविदा प्रक्रिया आणि निधी वापराबाबत आलेल्या तक्रारींची शासन गांभीर्याने दखल घेत आहे. याबाबत सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल तसेच विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा येऊ देणार नाही, असे आश्वासन मंत्र्यांनी सभागृहात दिले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.