Published On : Sun, Oct 28th, 2018

मेट्रो कडून सलग दुसऱ्या दिवशी महावितरणच्या केबलची हानी

Advertisement

नागपूर: शहरात सुरु असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामाचा फटका२ठिकाणी महावितरणच्या भूमीगत वाहिन्यांना बसला. परिणामी रामदासपेठ,धंतोली भागातील सुमारे ५हजार वीज ग्राहकांना पहाटेच्या सुमारास अंधाराचा सामना करावा लागला.

शनिवारी मध्यरात्री १२.३०वाजता रहाटे काँलनीजवळ खोदकाम करतेवेळी महावितरण च्या भूमीगत वाहिनीला जेसीबीच्या धक्का लागला.परिणामी काँग्रेस नगर,धंतोली, छोटी धंतोली, रहाटे काँलनी,गजानन नगर,छत्रपती नगर येथील वीजपुरवठा खंडित झाला. धंतोली शाखा अभियंता सचिन लांजेवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ दुसऱ्या वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा घेत खंडित पुरवठा सुरळीत केला.

Gold Rate
2 May 2025
Gold 24 KT 93,700/-
Gold 22 KT 87,100/-
Silver/Kg 95,400/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दुसरी घटना अलंकार चित्रपट गृहाजवळ पहाटे ५वाजता घडली.परिणामी रामदासपेठ, काचीपुरा परिसरातील २हजार वीज ग्राहक अर्धा तास अंधारात होते.

मागील दिड वर्षात महावितरणच्या रिजंट उपविभागात खोदकाम करतेवेळी मेट्रो रेल्वेकडून ४२ वेळा भूमीगत वाहिन्या ंना धक्का लागला आहे

Advertisement
Advertisement