Published On : Fri, Apr 26th, 2024

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; विदर्भातील ‘या’ मतदारसंघात होणार मतदान

Advertisement

नागपूर :देशभरात आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याच मतदान होत आहे. राज्यात 8 तरदेशात 88 मतदारसंघात मतदान होत आहे. राज्यात आज विदर्भातील यवतमाळ,बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, या ठिकाणी तर मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी या मतदारसंघात मतदान होत आहे.

लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात केरळ मधील वायनाड मतदारसंघात आज मतदान होत आहे.राहुल गांधींविरोधात वायनाडमध्ये भाजपचे के. सुरेंद्रन आणि सीपीआयच्या ॲनी राजा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे.

‘या’ मतदारसंघात इतक्या जागांसाठी होणार मतदान –
दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20जागा, कर्नाटकातील 14 जागा, राजस्थानमधील 13 जागा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 8जागा, मध्य प्रदेशातील 6 जागा, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5 जागा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 3 जागा आणि जम्मू-काश्मीर आणि त्रिपुरामधील 1 जागेचा समावेश आहे. याशिवाय मणिपूरची 1 जागा आहे.