नागपूर: भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) शनिवारी नागपूर आणि रामटेक मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली.
नागपूर लोकसभा मतदारसंघात 54. 11 टक्के मतदान झाले. यंदाच्या मतदानाची टक्केवारी 2019 मधील 57.57 टक्के मतदानाच्या च्या तुलनेत फार कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.तर रामटेकमध्येही 61 टक्के मतदान झाले असून ही टक्केवारी 2019 मधील 65.70 टक्के मतदानाच्या तुलनेत कमी आहे. ही टक्केवारी लक्षात घेता 2024 च्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय घट झाल्याचे चित्र आहे.
नागपुरात 22,23,281 नोंदणीकृत मतदार (11,13,182 पुरुष, 11,09,876 महिला आणि 223 इतर), त्यापैकी 12,02,962 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (6,27,479 पुरुष, 5,75,4513 महिला आणि इतर जणांचा समावेश आहे.
56.37 टक्के पुरुष मतदानासाठी बाहेर पडले, तर महिलांचे मतदान 51.85 टक्के इतके कमी झाले. इतर प्रवर्गातील 14.35 टक्के लोकांनीही मतदान केले.
नागपूर मतदारसंघात 55.76 टक्के मतदानासह नागपूर पूर्व, तर उत्तर नागपुरात 55.16 टक्के मतदान झाले. नागपूर दक्षिणमध्ये सर्वात कमी 52.80 टक्के मतदान झाले.
रामटेक मतदारसंघात 20,49,085 नोंदणीकृत मतदार (10,44,891 पुरुष, 10,04,142 महिला आणि 52 इतर), त्यापैकी 12,49,864 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.(यात 6,66,302 पुरुष, 5,83,556 महिला. 6 इतर)
याठिकाणी 63.77 टक्के पुरुष मतदानासाठी बाहेर पडले, तर महिलांचे मतदान 58.11 टक्के इतके कमी झाले; इतर प्रवर्गातील 11.54 टक्के लोकांनीही मतदान केले.
रामटेक मतदारसंघात उमरेडमध्ये सर्वाधिक 67.16 टक्के मतदान झाले, त्यानंतर रामटेकमध्ये 66.37 टक्के मतदान झाले.कामठी येथे सर्वात कमी 58.69 टक्के मतदान झाले.नागपूरमधील सर्व 26 आणि रामटेकमधील 28 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) बंद झाले आहे.या निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 रोजी जाहीर होईल.