सर्व संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन
नागपूर: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 नागपूर व रामटेक निर्वाचन क्षेत्रातील मतमोजणी दिनांक 23 मे 2019 रोजी कळमना मार्केट यार्ड येथे होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने समितीचे कळमना मार्केट यार्ड अंतर्गत सर्व बाजार दिनांक 22 मे 2019 रेाजी सकाळी 8.00 ते दिनांक 24 मे 2019 रोजी सायंकाळपर्यंत व्यवहार बंद राहतील. तसेच दिनांक 21 मे 2019 रोजी सायंकाळी 7 ते दिनांक 24 मे 2019 रोजी सायंकाळपर्यंत कोणतीही व्यक्ती व वाहनास बाजार आवारामध्ये प्रवेश मिळणार नाही. तरी सर्व संबंधित शेतकरी बंधू, अडते, व्यापारी, हमाल व सामान्य नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी केले आहे.
तसेच शेतकरी बंधूंनी दिनांक 22 ते 24 मेपर्यंत बाजार समितीत माल विक्रीसाठी आणू नये,
असेही सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
टिमकी चीमाबाई पेठ में 6 घरों में चोरी.. #crime #nagpurnews #accusedarrest #latestnews
16 नगरसेवकों ने गुटनेता बदलने की मांग ... #latestnews #politicsnews #maharashtranews #maharashtra
स्कॉर्पियो-पिकअप की भीषण टक्कर, तीन घायल ...#news #latestnews #update #maharashtranews
बेमौसम बारिश से गर्मी से राहत ...#news #latestnews #maharashtranews #vidarbha
बच्चू कडू पर वानखड़े का पलटवार.. #maharashtranews #politicsnews #latestnews
कुस्तीगीर परिषद को हाईकोर्ट से झटका.. #maharashtranews #latestnews #wardha








