नागपूर : नागपुरात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. ते नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर प्रयत्न करण्याऐवजी पालकमंत्र्यानी लॉकडाऊन घोषित केला. हा निर्णय म्हणजे शुध्द वेडेपणा असल्याची प्रतिक्रिया माजी महापौर संदीप जोशी यांनी नोंदविली आहे.
ते पुढे म्हणाले, गोरगरीब जनता, मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि नियम पाळणाऱ्यांसाठी हा पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत क्लेशदायक आहे.
कडक कायदे करून, जनजागृती करून नासगरिकांना नियम पाळण्यास बाध्य करून रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविता आले असते. मात्र आपले अपयश झाकण्यासाठी सामान्यांवर लॉकडाऊन लादणे, हे चुकीचे पाऊल आहे. याचा आपण निषेध करतो, असेही माजी महापौर संदीप जोशी यांनी म्हटले आहे.
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement