Published On : Wed, Feb 13th, 2019

वीडियो वाईरल – गणेशपेठ परिसरात ऑटो चालकांकडुन वाहतूक पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न

Advertisement

नागपुरात गणेशपेठ बसस्थानकासमोर ऑटो चालकांनी ( ऑटो रिक्क्षा) दोन वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ऑटो चालकांनी वाहतूक पोलिसांना माराहाण केल्याच्या घटनेचा व्हीडिओ वाईरल झाला आहे..प्रकाश सोनवणे आणि किशोर धपके असे जखमी वाहतूक पोलिस कर्मचा-यांची नावे आहेत. किशोर धपके हे अधिक जखमी आहे। याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी मयूर राजूरकर आणि सोनू कांबळे या दोन आरोपी ऑटो चालकांना अटक केली आहे.

सोनू कांबळें याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असुन अट्टल गुन्हेगार आहे।

गणेशपेठ भागात प्रचंड वाहतूक असते..तसेच परिसरात अनेक वाहने नियमबाह्य पार्क केलेले असतात. त्यामुळे चेंबर तीनचे वाहतूक पोलीस कर्मचारी किशोर धपके आणि प्रकाश सोनवणे राहुल डिलक्स हॉटेलसमोर चालान व जामरची कारवाई करत होते. ही कारवाई सुरु असताना वाहतूक कर्मचा-यांशी ऑटो चालक मयूर राजुरकर व सोनू कांबळे यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. वादातूनच त्यांनी वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश सोनावणे व किशोर धपकेंना जबर मारहाण केली.त्यांनी एका पोलीस कर्मचा-याची वर्दीही फाडली…त्या दोघांनी धपके यांना जबर मारहाण केली इतकेच नव्हे धपके यांच्या डोक्यावर दगड मारण्याचा प्रयत्न केला, पोलिस गाडी ला दगड मारले। या घटनेनंतर गणेशपेठ पोलिसांना दोन आरोपी ऑटो चालकांना अटक केली आहे ,महत्वाचं म्हणजे यापूर्वीही गणेशपेठ परिसरात वाहतूक पोलिसांना मारहाणीच्या घटना घडली आहे.ह्या घटनेनंतर पोलिस विभागात हड़कंप मचला आहे ,पोलिसांनी नौकरी कशी करायची अशी चर्चा नागपुर पोलिस विभागात सुरु झालेली आहे।

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.