Published On : Tue, Apr 2nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

लोकसभेसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नेत्यांच्या नावांचा समावेश

मुंबई :लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला पार पडणार असून याच्या प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. शिवसेना, भाजपा, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या स्टार प्रचारकांच्या याद्या काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आता काँग्रेसने देखील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत काँग्रेस पक्ष सोडून जाण्याची चर्चा असणारे जय निरुपम यांच्या नावाचाही समावेश करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगली आहे.

निरुपम हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. ठाकरे गटाने येथून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कीर्तिकर यांच्या उमेदवारीवरून निरुपम नाराज असल्याची चर्चा होती.

काँग्रेसने महाराष्ट्रात 19 एप्रिलला होऊ होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली.

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांनी नावे –
या यादीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आदींचा समावेश आहे. त्याशिवाय अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे, नसीम खान, अमित देशमुख, नितीन राऊत, वसंत पुरके, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, कुमार केतकर, भालचंद्र मुणगेकर, कन्हैया कुमार आदींना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

Advertisement
Advertisement