१ आरोपीस अटक
रुपये ८५ हजार ६५० किंमतीचा मुद्देमाल जप्त
रामटेक -उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारुचे निर्मिती साहित्य व स्पिरीटसह मद्य साठा साहित्य जप्त करत १ आरोपीस अटक केली असून रुपये ८५ हजार ६५० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास सुरु आहे. √ जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे यांच्या आदेशा नुसार अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी कारवाई केली. यामध्ये दुय्यम निरीक्षक दिलीप बडवाईक व ASI संजय मोरे, प्रशांत येरपुडे, चंद्रशेखर दरोडे, कॉन्स्टेबल राहुल पवार, महादेव कांगणे, आशिष फाटे, वाहन चालक राजू काष्टे व रवी निकाळजे, सोनाली खांडेकर यांनी विशेष मेहनत घेऊन मोहीम यशस्वी केली.
● मुद्देमाल : 1)बिस्लरीच्या कागदी खोक्यात मॅकडॉल नो. 1 विदेशी दारूच्या 180 मि. ली. 280 बॉटाल याची अंदाजे किंमत रु 4,200/-2) बिस्लरीच्या कागदी खोक्यात एम्प्रेरीअर ब्लू विदेशी दारूच्या 180 मि. ली. 190 बॉटाल याची अंदाजे किंमत रु 26,600/- एकूण अंदाजे किंमत रुपये–68,600/-3) 200 लिटर क्षमतेच्या एक प्लास्टिक बँलर स्पिरिटने पूर्ण भरलेल्या अंदाजे किंमत रु 6700/- 4)200 लिटर क्षमतेच्या एक प्लास्टिक बँलर स्पिरिटने 150 लिटर भरलेल्या अंदाजे किंमत रु 5200/-5) 200 लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक बँलर स्पिरिटने रिकामे अंदाजे किंमत रु 1400/- 6) 20 लिटर क्षमतेच्या 16 प्लस्टिक कॅन रिकामे (दारूचा उग्र वास) अंदाजे किंमत रु 3200/-7)05 लिटर क्षमतेच्या 02 प्लस्टिक कॅन रिकामे (दारूचा उग्र वास) अंदाजे किंमत रु 100/- 8) बाँबे स्पेशल व्हिस्की 750 मी.ली चे 22 रिकाम्या बाटला अंदाजे किंमत रु 50/- 9)एक प्लस्टिक चाळणीत अंदाजे किंमत रु 100/- 10) एक झाकण काढण्याचे पणा अंदाजे किंमत रु 300/- एकूण अंदाजे किंमत रुपये–17,050/- असा दोन्ही मिळून एकूण अंदाजे किंमत रुपये–86,650/-
● आरोपी नाव : अमर रिझुमल मूलचंदनी. वय 33 वर्षे धंदा – दारू वाहतूक व विक्री रा.इ ब्लॉक 31 बुध विहाराजवळ सुगत नगर नागपूर पोलीस स्टेशन जरीपटका