Published On : Wed, Jun 11th, 2025
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रातील मद्यप्रेमींमध्ये चिंता;मद्याच्या दरात होणार वाढ

सरकारचा महसूल वाढवण्याचा निर्णय
Advertisement

मुंबई – महाराष्ट्रातील मद्यप्रेमींना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर (IMFL) दीड टक्के अतिरिक्त शुल्क लावण्यात येणार आहे. या वाढीमुळे मद्याचे दर चढणार असून, सरकारच्या तिजोरीत सुमारे १४ हजार कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये विदेशी मद्य विक्रीसाठी नव्या अटी-

राज्य सरकारने आता हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना कराराद्वारे सीलबंद विदेशी मद्य विक्रीची परवानगी दिली आहे. यासाठी १० ते १५ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे, जे महसुलात आणखी भर घालेल.

उत्पादन शुल्क विभागात भरती, नवीन कार्यालयांची स्थापना-

Advertisement

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी १२२३ नव्या पदांची भरती होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्वतंत्र विभागीय कार्यालय, तसेच ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर याठिकाणी अधीक्षक कार्यालये उभारण्यात येणार आहेत.

AI कंट्रोल रूमची निर्मिती

अवैध मद्य उत्पादन आणि विक्रीवर नजर ठेवण्यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) आधारित कंट्रोल रूम उभारण्यात येणार असून, यामुळे गोरखधंद्यांवर नियंत्रण ठेवता येणार आहे.

इतर महत्त्वाचे निर्णय-

मंत्रिमंडळ बैठकीत अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय झाला असून, आगामी अधिवेशनात यासाठी विधेयक सादर केले जाणार आहे. याशिवाय, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात मोठी वाढ जाहीर करण्यात आली आहे. बीपीटी, एमपीटी आणि बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी ६२५० रुपये ते १०,००० रुपयांपर्यंत विद्यावेतनात वाढ करण्यात आली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.