नागपूर: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मनपातील महापौर कक्षा समोरील दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मा.महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड व आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते तैलचित्राला पुष्प अर्पण करण्यात आले. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन जनतेच्या हितासाठी मिळून कार्य करू असे प्रतिपादन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., उपायुक्त श्री निर्भय जैन, उपायुक्त श्री राजेश भगत, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, सहाय्यक आयुक्त श्री श्याम कापसे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री प्रमोद हिवसे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते
उपमहापौर कक्ष व सत्तापक्ष नेता कक्ष येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तत्पूर्वी मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी महाल स्थित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. आमदार श्री प्रवीण दटके , उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड,माजी आमदार श्री गिरीश व्यास,माजी महापौर दयाशंकर तिवारी, नगरसेवक श्री. रामभाऊ आंबुलकर, नगरसेवक श्री.मनोज साबळे, नगरसेवक श्री. श्रीकांत आगलावे यांच्या इतर मान्यवर उपस्थित होते.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY






