Published On : Wed, Jul 1st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात 2 हजारांच्या उधारीवरून जीवघेणा हल्ला; हिस्ट्रीशीटरसह दोन अल्पवयीन ताब्यात

Advertisement

नागपूर : अवघ्या 2 हजारांच्या उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग परिसरात घडली. हिस्ट्रीशीटर आरोपीने आपल्या दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. घटनेनंतर इमामवाडा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपीसह दोन्ही अल्पवयीनांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान परिसरातील रहिवासी सूरज मुरमुरे यांनी काही दिवसांपूर्वी आरोपी मयूर फुले याच्याकडून ₹2 हजार उधार घेतले होते. सूरज यांनी मूळ रक्कम परत केल्यानंतरही मयूर फुले हा व्याजाच्या नावाखाली आणखी ₹1 हजारांची मागणी करत होता. याच कारणावरून त्याने सूरज यांना रामबाग परिसरात बोलावले.

दोघांमध्ये पैशांच्या कारणावरून वाद झाला. संतापलेल्या मयूर फुलेने लाकडी दांडक्याने सूरज यांच्या डोक्यावर वार केला. त्याच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांनीही सूरज यांना बेदम मारहाण केली. हल्ल्यानंतर आरोपींनी सूरज यांच्या खिशातील ₹1 हजारांची रोकड हिसकावून घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप आहे.

घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी सूरज यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वेगाने तपास करून मुख्य आरोपी मयूर फुले आणि त्याच्या दोन्ही अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

प्राथमिक तपासात मुख्य आरोपी मयूर फुले याच्याविरुद्ध यापूर्वीही खून, खुनाचा प्रयत्न आणि मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. तसेच तो बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय करत असल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास इमामवाडा पोलीस करत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.