Published On : Tue, May 31st, 2022
By Nagpur Today Nagpur News

मनपा निवडणुकीसाठी महिला आरक्षण सोडत मंगळवारी

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मंगळवारी ३१ मे रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सकाळी १० वाजता महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढली जाणार आहे

महिला आरक्षणाची सोडत काढल्यानंतर बुधवार १ जून रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध केले जाईल. आरक्षणाबाबत हरकती व सूचना असल्यास त्या १ ते ६ जून या कालावधीत दुपारी ३ वाजतापर्यंत महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करावे लागणार आहे, अशी सूचना मनपा निवडणूक विभागातर्फे देण्यात आली आहे.

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement