मुंबई :आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यातच भाजपने लोकसभा उमेदवाराची यादी जाहीर केली. या यादीत भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डावलले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर संताप व्यक्त केला. तसेच ठाकरेंनी भरसभेत नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीसोबत येण्याची ऑफर दिली आहे.नितीन गडकरी जी भाजप सोडून महाविकास आघाडीत या, तुम्हाला खासदार करतो,असे ठाकरे म्हणाल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा.महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची” अशी खुली ऑफर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली आहे. उद्धव ठाकरेंची धाराशिवमध्ये सभा झाली, यावेळी ते बोलत होते.
अहो नितीन जी सोडून द्या भाजप आणि राहा उभं, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो. महाराष्ट्राचे पाणी दाखवा, महाराष्ट्राची धमक दाखवा. महाराष्ट्र दिल्ल समोर कधीही झुकला नाही. आग्र्यात औरंगजेबासमोर छत्रपती शिवाजी महाराज झुकले नव्हते, ती यांच्यासमोर झुकणार. आज मी नितीन गडकरी यांना जाहीर सांगत आहे, राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो, असे ठाकरे म्हणाले.