Published On : Wed, May 12th, 2021

कोव्हिड नियमांचे पालन करीतच यापुढे जगणे शिकावे

मनपा-आयएमए आयोजित कोव्हिड संवाद कार्यक्रमात तज्ज्ञांचा सल्ला

नागपूर : काळ कठीण आहे. कोरोना खूप लवकर आपल्या आयुष्यातून जाईल, असे वाटत नाही. लॉकडाऊन हा कायमस्वरूपी पर्याय असू शकत नाही. त्यामुळे कोव्हिड नियमांचे पालन करीत यापुढे जगणे शिकावे लागेल. सोशल डिस्टंन्सिंग, हॅण्ड सॅनिटायझेशन यासोबत मास्कला आता आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनवावा लागेल, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.

Advertisement

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या सौजन्याने बुधवारी (ता. १२) आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. अलेक्सिस हॉस्पीटलचे सहसंचालक डॉ. नीलेश अग्रवाल आणि संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे यामध्ये सहभागी झाले होते. ‘कोव्हिडसोबत कसे जगावे’ ह्या विषयावर बोलताना डॉ. नीलेश अग्रवाल म्हणाले, कोव्हिड आता कुणाला होणार नाही, असे म्हणताच येत नाही. दुसऱ्या लाटेने कहर केला. हजारो नागरिक कोरोना पॉझिटिव्ह झाले. हा संसर्ग टाळता येऊ शकतो. यापुढे आता आपली जीवनशैलीच आपल्याला बदलावी लागेल. सोशल डिस्टंन्सिंग, हॅण्ड सॅनिटायझर यासोबतच आता मास्क अंगवळणी पाडावा लागेल. मास्क ही संसर्ग टाळण्यासाठी सर्वोत्तम ढाल आहे. ही ढाल सतत आपल्याजवळ ठेवा. कुठलीही लक्षण आढळली अथवा पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलात की तातडीने चाचणी करून घ्या, जेणेकरून तातडीने उपचार घेता येतील.

डॉ. नितीन शिंदे म्हणाले, कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले अथवा लक्षणे दिसली की स्वत:ला कुटुंबापासून विलग करा. विलगीकरणात राहा. विलगीकरणात जाणे म्हणजे कोरोना आहेच असे नाही. परंतु आपल्याला संसर्ग झाला असेल तर तो संसर्ग इतरांमध्ये जाऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे. चाचणीचा निकाल येईपर्यंत ही काळजी घ्यावी लागेल. शिवाय जी व्यक्ती विलगीकरणात आहे, त्यांच्या मदतीसाठी कुणी नसतं. परंतु एखादे कुटुंब पॉझिटिव्ह आहे आणि गृहविलगीकरणात आहे म्हणून त्यांना कुठली मदत करता येणार नाही, हे डोक्यातून काढून टाका. येथेही कोरोना नियमावलीचे पालन करून आपल्याला गृहविलगीकरणातील व्यक्तींना मदत करता येते. दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने केंद्र शासनाने जाहीर केलेल्या वयोगटातील व्यक्तीने लसीकरण करुन घेणे अत्यावश्यक आहे. तो यावरील रामबाण उपाय आहे, असे म्हणत डॉ. शिंदे यांनी स्वत:च स्वत:चा कोरोनापासून बचाव करा, नियमावली पाळा, असा सल्ला दिला.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement