Published On : Tue, Dec 12th, 2017

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूर येथील जनआक्रोश मेळाव्यात केलेले भाषण

Advertisement
Vikhe Patil

File Pic

नागपूर: नागपूरची ही संघर्षाची भूमी आहे. 1877 मध्ये एम्प्रेस मिलच्या कामगारांचा पहिला एल्गार याच भूमीत पेटला होताआणि जनआक्रोश-हल्लाबोलच्या निमित्ताने संपूर्ण देश आज नागपुरातील शेतक-यांचा एल्गार पाहतो आहे.

आज इथे मोठ्या संख्येने जमलेला हा जनसमुदाय सरकारविरोधात जनतेच्या मनातील उद्रेक आहे,महाराष्ट्रातील जनतेत, शेतकरी बांधवांमध्ये सरकारबद्दलचा असलेल्या रोषाचे प्रतिक आहे.

गेल्या तीन वर्षांत या सरकारने केवळ वारेमाप घोषणा केल्या आणि त्या घोषणांची जाहिरातबाजी केली. ‘होय, मी लाभार्थी, हे माझं सरकार’च्या फसव्या जाहिराती केल्या. खरे पाहिले तरया राज्यात दोनच लाभार्थी आहेत, एक म्हणजे भाजप आणि दुसरे म्हणजे उद्धव ठाकरे.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गेल्या तीन वर्षांचा या सरकारचा कारभार, शेतकरी रोज मरत असताना त्याच त्या फसव्या घोषणा,बोगस कर्जमाफी सारेच गोलमाल आहे.

कर्जमाफी योजनेला शिवछत्रपतींचं नाव देऊन राज्याच्या आराध्य दैवताच्या नावाआड आपले अपयश झाकण्याचा उद्योग सरकारने केला आहे. या सरकारने दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्र वाटण्याचा इव्हेंट केला. प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच नाही. कर्जमाफीच्या घोषणेनंतरही 1500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, यापेक्षा सरकारचे दुसरे अपयश कोणते आहे?

सोयाबिनचा प्रश्न आज ऐरणीवर आहे, सोयाबिन, कापूस, तूर, मूग, उडीद, सर्वच पिकांमध्ये शेतकऱ्याला लुटले जाते आहे. बोंडअळीनं कापसाचं 75 टक्के क्षेत्र उध्वस्त झाले आहे.

म्हणूनच या सरकारला अद्दल घडवण्याची आता वेळ आलेली आहे. या जमलेल्या तमाम जनतेच्यावतीनं या सरकारला, या नागपूर भूमीत मला शेवटचा इशारा द्यायचाय..

ट्वीटरपर सरकार चलाये

किसानों को मौत दिलाये

बच्चों को भूखा मरवाये

अपने हक की जो बात करेगा

उसको ही देशद्रोही ठहराये..

क्या यही है मेरी सरकार?

ऐसी सरकार का तख्तोताज उतार दो

आम आदमी की ताकद दिखला दो…

Advertisement
Advertisement
Advertisement