Published On : Wed, Mar 18th, 2020

लॉन, मंगल कार्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

Advertisement

नागपूर: शहरात ‘कोरोना व्हायरस’चा प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील सर्व लॉन, मंगल कार्यालयेही ३१मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

नागपूर शहरात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा व शहर प्रशासनातर्फे सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये, शॉपिंग मॉल, सिनेमागृह, जिम आदी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश नुकतेच राज्य शासनाने दिले. त्यानुसार मनपा हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये, शॉपिंग मॉल, सिनेमागृह, जिम आदी बंद ठेवण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. मात्र किराणा दुकान, औषधालय, दूध, भाजीपाला व अन्य आवश्यक सेवा सुरू ठेवाव्यात असेही त्यांनी म्हटले आहे.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरातील सर्व धार्मिक तथा सार्वजनिक कार्यक्रमही तूर्तास स्थगित करण्यात यावे, सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील सर्व लॉन तसेच मंगल कार्यालयातील कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहनही मनपा आयुक्तांनी केले आहे.

मनपा हद्दीबाहेरील महाविद्यालयही बंद करण्याचे आवाहन

Advertisement

मनपा हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मनपाच्या हद्दीबाहेरीलही अभियांत्रिकी आणि इतर महाविद्यालयात बाहेरगावचे विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे या महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. शहरातील सर्व ट्यूशन क्लासेसही ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Advertisement
पति-पत्नी चला रहे थे नशे का कारोबार! ##NagpurNews #Ganja #NDPS #CrimeNews #PoliceAction #news

पति-पत्नी चला रहे थे नशे का कारोबार! ##NagpurNews #Ganja #NDPS #CrimeNews #PoliceAction...

बीच-बचाव करना पड़ा भारी! युवक पर चाकू से ताबड़तोड़ हमला #NagpurNews  #Crime #murdernews #police

बीच-बचाव करना पड़ा भारी! युवक पर चाकू से ताबड़तोड़ हमला #NagpurNews #Crime...

नागपुर में MD ड्रग्स तस्कर गिरफ्तार! #NagpurNews #MDDrugs #CrimeBranch #NDPS #CrimeNews #newsupdate

नागपुर में MD ड्रग्स तस्कर गिरफ्तार! #NagpurNews #MDDrugs #CrimeBranch #NDPS #CrimeNews #newsupdate

PM मोदी के कथित आपत्तिजनक पोस्टरों पर बवाल! #NagpurNews #BJP #BJYM #NarendraModi #politicalnews

PM मोदी के कथित आपत्तिजनक पोस्टरों पर बवाल! #NagpurNews #BJP #BJYM #NarendraModi...

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

अमरावती में हेलमेट अभियान, चालान शुरू #vidarbhanews  #amravati #newsupdate #maharashtra  #vidarbha

अमरावती में हेलमेट अभियान, चालान शुरू #vidarbhanews #amravati #newsupdate #maharashtra #vidarbha

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges