Published On : Thu, Jun 27th, 2019

उद्या पासून दर तासाला मेट्रो सेवेचा शुभारंभ

नागपूर : महा मेट्रो नागपूरच्या दर तासाच्या मेट्रो प्रवासी सेवा उद्या पासून सुरु होत आहे. सकाळी ८.०० वाजता पासून पहिली फेरी सिताबर्डी येथून खापरी स्टेशनच्या दिशेने रवाना होईल तसेच त्याचवेळी खापरी मेट्रो स्टेशन येथून देखील मेट्रो ट्रेन सिताबर्डी इंटरचेंज स्टेशन करता रवाना होईल.

प्रत्येक तासावर सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत मेट्रो फेऱ्या नागरिकांकरिता सुरु राहतील. तसेच सिताबर्डी स्टेशनवरून सायंकाळी ७.००वाजता व खापरी स्टेशन ते सिताबर्डी स्टेशन करिता ८.०० वाजता मेट्रोची शेवटची फेरी होईल.

प्रवासी सेवेमध्ये वाढ झाल्याने नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार मुख्यत: जे मिहान औद्योगिक वसाहत येथे कार्यरत आहे. मिहान सेझ येथील कंपनीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी मेट्रोची प्रवासी सेवा ही त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार कार्यरत असावी या करीता बऱ्याच दिवसांपासून मेट्रो प्रशासनाकडे मागणी केली होती जे की आता पूर्ण होत आहे आहे.