Published On : Tue, Aug 9th, 2022

‘हर घर तिरंगा’ अभियानाची भाजपातर्फे सुरूवात

Advertisement

– आमदार कृष्णा खोपडे यांना अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केला तिरंगा सुपूर्द

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियानाचा सोमवारी ८ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे शुभारंभ करण्यात आला. पूर्व नागपूरचे आमदार श्री. कृष्णा खोपडे यांना तिरंगा ध्वज सुपूर्द करून भाजपा प्रदेश सचिव अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी या अभियानाची सुरुवात केली.

याप्रसंगी प्रा. प्रमोद पेंडके, संजय अवचट, राजू गोतमारे, राजेश संगेवार, सुरेश बारई, अशोक देशमुख, बाल तिवारी, किशोर सायगन, खुशाल वेळेकर, सुनील आगरे, मधुर बारई, संतोष श्रीवास्तव, जेठु पुरोहित, कल्पना सारवे, मोसमी वासनिक, गायत्री उचितकर, ज्योती वाघमारे, कविता हत्तीमारे, डॉली सारस्वत, सिंधुताई पराते, के. एस. देशमुख, राहुल महात्मे आदी उपस्थित होते.

देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देशात हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद ठरावा असे हे अभियान आहे. या अभियानामध्ये प्रत्येकाला सहभागी करून घेण्यासाठी तसेच प्रत्येक व्यक्तीच्या घरावर राष्ट्राचा अभिमान आपला भारतीय तिरंगा फडकाविला जावा यासाठी पूर्व नागपूरमधील जनतेला तिरंगा सुपूर्द करण्यात आलेला आहे. ध्वज संहितेनुसार आपल्या तिरंग्याचा कुठल्याही प्रकारे अपमान होणार नाही, यासाठी नागरिकांना तिरंगा फडकाविण्याची माहिती सुद्धा देण्यात येत असल्याचे यानिमित्ताने ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.