Published On : Mon, Apr 8th, 2019

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महामतदार जागृती अभियानाचा शुभारंभ

Advertisement

नागपूर, रामटेक क्षेत्रात पथनाट्याच्या माध्यमातून करणार मतदानाचे आवाहन

नागपूर : सिस्टॅमॅटिक वोटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्राम (स्वीप) अंतर्गत रिजनल आऊटरीच ब्युरो, पुणे, महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्र, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आणि मुख्य निवडणूक आधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर, रामटेक लोकसभा मतदार संघातील महामतदार जागृती अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, निवडणूक नोडल अधिकारी (नागपूर ग्रामीण) राजेंद्र भुयार, रिजनल आऊटरीच ब्युरोच्या सहायक संचालक मिना जेटली, नायब तहसीलदार अश्विनी जाधव, विस्तार अधिकारी शेषराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, मनपाच्या शिक्षण विभागाचे विनय बगले उपस्थित होते.

अभियानांतर्गत मतदार जनजागृती रथ तयार करण्यात आला आहे. या रथावर ‘लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा’, ‘मतदान करा आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करा’, ‘आपल्या मतदारसंघातील निवडणुकांचा दिनांक जाणा. अवश्य मतदान करा’ असे संदेश असून लोकसभा मतदारसंघातील निरनिराळ्या भागात हा रथ फिरणार आहे. विशेष म्हणजे या रथासोबतच पथनाट्याची चमू असून जेथे-जेथे रथ जाईल तेथे-तेथे सूचना व प्रसारण मंत्रालयाची चमू पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचे आवाहन करेल.

Advertisement

या रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी फीत कापून केला. रिजनल आऊटरीच ब्युरोच्या सहायक संचालक मिना जेटली यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांना अभियानाची माहिती दिली. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनीही यावेळी मतदारांनी उत्साहाने मतदान करावे, असे आवाहन केले. यावेळी रंगधून कलामंचचे मोरेश्वर दंडारे, नूतन मोरे व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.