Published On : Fri, Apr 21st, 2017

लातूर महापालिकेवर भाजपचा झेंडा

bjp-flag

Representational Pic


लातूर:
संपूर्ण राज्याचं आणि देशभरातील काँग्रेसचं लक्ष लागलेल्या लातूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

महानगरपालिकेच्या 70 जागांपैकी तब्बल 38 जागांवर विजय मिळवून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.

तर सत्ताधारी काँग्रेसला 31 जागीच यश मिळवता आलं. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ एका जागेवर आटोपली.

Gold Rate
18 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,900 /-
Gold 22 KT ₹ 1,02,200 /-
Silver/Kg ₹ 1,26,500/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महत्त्वाचं म्हणजे 2012 मधील निवडणुकीत भाजपला एकही जागा नव्हती. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपने थेट झिरोवरुन हिरो होत, सत्ता काबिज केली आहे.

तर हुकूमाची गढी म्हणून ओळखली जाणारी लातूर महापालिका काँग्रेसने गमावली आहे.

लातूर महानगरपालिका निकाल 2017

भाजप – 41

काँग्रेस – 28

राष्ट्रवादी – 01

काँग्रेसने लातूरही गमावलं

काँग्रेसचा गढ म्हणून विलासराव देशमुखांच्या लातूरकडे पाहिलं जात होतं. विलासरावांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख यांच्याकडे लातूर काँग्रेसची सूत्रं आली. त्यांच्याच नेतृत्त्वात यंदा लातूर मनपाची निवडणूक लढण्यात आली. मात्र काँग्रेसला आपला गढ आणि देशमुखांची गढी राखता आली नाही.

संभाजी पाटील-निलंगेकरांचं यश

लातुर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खांद्यावर धुरा सोपवण्यात आली होती. जिल्हा परिषदेप्रमाणेच संभाजी पाटील यांनी लातूर मनपासाठीही काटेकोर नियोजन करुन ऐतिहासिक विजय मिळवला.

लातूर महानगरपालिका निकाल

पक्ष                         निकाल 2012             निकाल 2017
भाजप                            00                               41
काँग्रेस                            49                               28
राष्ट्रवादी                          13                               01
शिवसेना                         06                              00
अपक्ष/अन्य इतर             02                              00

Advertisement
Advertisement