Published On : Mon, Nov 17th, 2025
By Nagpur Today Nagpur News

शेवटची संधी; ‘लाडकी बहीण’च्या 1,500 रुपयांचा हप्ता थांबू नये तर त्वरित E-KYC करा

Advertisement

मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. राज्य सरकारने या योजनेची E-KYC प्रक्रिया अनिवार्य केली असून 18 नोव्हेंबर ही अंतिम मुदत ठरवली आहे. उद्या तारीख संपल्यानंतर जे लाभार्थी E-KYC पूर्ण करणार नाहीत, त्यांचे महिन्याचे 1,500 रुपयांचे हप्ते तात्पुरते बंद होतील.

महिला व बालकल्याण विभागानुसार, योजना अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी E-KYC बंधनकारक करण्यात आली आहे. अनेक महिलांनी अजूनही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने विभागाने तातडीने E-KYC करण्याचे आवाहन केले आहे.

Gold Rate
13 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,41,000/-
Gold 22 KT ₹ 1,31,100 /-
Silver/Kg ₹ 2,64,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लाभार्थी महिला ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर जाऊन ऑनलाइन E-KYC करू शकतात. आधार क्रमांक टाकून OTP पडताळणी केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होते.

तांत्रिक समस्या आल्यास जवळच्या अंगणवाडी केंद्रात, सेतू केंद्रात किंवा तहसील कार्यालयात जाऊनही E-KYC करता येते. यासाठी आधारसह आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात.

सरकारने स्पष्ट केले आहे की अंतिम तारखेनंतर प्रक्रिया न केल्यास मिळणारा आर्थिक लाभ थांबेल. त्यामुळे सर्व लाभार्थींनी उद्यापूर्वीच E-KYC पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement