Published On : Tue, Jul 14th, 2020

लक्ष्मि नगर जलकुंभ येथे ५०० मिमी बटरफ्लाय व्हॉल्व दुरुस्तीसाठी १२ तासांचे शटडाऊन १६ जुलै

क्ष्मीनगर झोनचा काही भाग गुरुवारी राहणार बाधित

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी लक्ष्मी नगर जलकुंभ परिसरातील ५०० मिमी बटरफ्लाय व्हॉल्वमधील गळतीच्या दुरुस्तीसाठी १६ जुलै (गुरुवार) रोजी सकाळी १० ते रात्री १० दरम्यान शटडाऊन घेणार आहेत.

या कामामुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:

सुरेंद्र नगर, देव नगर, LIC कॉलोनी, नरगुंदकर लेआऊट, विकास नगर, दामोदर सोसायटी, संताजी कॉलोनी, जुनी अजनी, NIT लेआऊट, धोटे लेआऊट, अजनी, चुनाभट्टी अजनी, अंबिका नगर, बोरकुटे वाडा, प्रशांत नगर, समर्थ नगर, सहकार नगर, राहुल नगर, गजानन नगर, हिंदुस्तान कॉलोनी वर्धा रोड, प्रगतीशील कॉलोनी वर्धा रोड, राजीव नगर, प्रियांका वाडी, छत्रपती नगर चा काही भाग, नवजीवन कॉलोनी व नीरी कॉलोनी

या शटडाऊन दरम्यान टँकरद्वारे ही पाणीपुरवठा शक्य होणार नसल्याने मनपा व OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याची विनंती केली आहे.