नागपूर : फिर्यादी सुधा कृष्णकुमार गहरवार ( वय ६७ वर्ष रा. प्लॉट नं. ३८/१९ जयदुर्गा सोसायटी नं. ०१ नरेन्द्र नगर पो. ठाणे बेलतरोडी) येथील घरी भाजी कापत बसल्या असतांना दोन इसमांनी चाकूचा धाक दाखवत सुधा यांच्या गळयातील सोन्याची पोत, बेडरुम मधील ऑयपॅड आणि हाताची घडी असा एकुण ३७,००० /- रुपयाचा मुददेमाल जबरदस्तीने चोरी करुन पळवून नेला.
यांनतर फिर्यादी सुधा कृष्णकुमार गहरवार यांनी या घटनेसंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तकारीवरुन अप. कं. १४५/२३ कलम ४५१,३९२, ३४ भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी आरोपींना पकडले.
अर्पीत रत्नाकर पोटे, वय २२ वर्षे, रा. प्लॉट क.६०८, दर्शन कॉलनी, केडीके कॉलेज जवळ, पो.ठा.नंदनवन, धनंजय उर्फ राहुल भास्कर बारापात्रे, वय २३ वर्षे, रा. प्लॉट क. १०५, विजयलक्ष्मी पंडीत नगर, रमना मारोती मंदीर जवळ, पो.ठा. नंदनवन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना पोलिसांनी पल्सर वाहनासह अटक केली व गुन्हयात चोरून नेलेला सपुर्ण मुद्देमाल हस्तगत केला.