
19 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास गंगा-जमुन सिमेंट रोड आणि परिसरातील गल्लींमध्ये पोलिसांनी ही मोहीम राबवली. सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव आणि संकेत देऊन ग्राहकांना आकर्षित करत असल्याच्या आरोपावरून सहा महिलांविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये गुन्हा क्रमांक 841/2026, 842/2026 आणि 843/2026 अंतर्गत PITA कायद्याच्या कलम 7 आणि 8 नुसार कारवाई करण्यात आली.
दरम्यान, परिसरात रस्त्यावर ऑटो उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दोन ऑटोचालकांनाही पोलिसांनी लक्ष्य केले. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 285 अंतर्गत गुन्हा क्रमांक 839/2026 आणि 840/2026 दाखल करण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वात महिला पोलीस कर्मचारी आणि लकडगंज पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. गंगा-जमुन परिसरातील सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.



