
मुंबई : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या रकमेसाठी राज्यातील लाखो महिला गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत होत्या. नोव्हेंबर महिन्याचे पैसे अद्याप खात्यात जमा न झाल्याने संभ्रमाचे वातावरण होते. मात्र आता सरकारकडून महत्त्वाची माहिती समोर आली असून लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.
ई-केवायसीसाठी मुदतवाढ-
लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंड सुरू राहण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. पूर्वी निश्चित केलेली 18 नोव्हेंबरची अंतिम मुदत महिलांचे ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे अडचणीत आली होती. त्यामुळे शासनाने मोठा निर्णय घेत हा कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवला आहे. अनेक महिलांसाठी ही निर्णय म्हणजे मोठा दिलासा मानला जात आहे.
नोव्हेंबरचा हप्ता उशीर — पण पुढे ‘दुहेरी’ फायदा?
नोव्हेंबरचे 24 दिवस उलटूनही 1500 रुपयांचा हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी होती. त्यातच राज्यात लागू असलेल्या आचारसंहितेमुळे योजनेचे पैसे थांबणार अशीही भीती होती. मात्र प्रशासनाने स्पष्ट केले आहे की आचारसंहितेचा या योजनेवर कोणताही परिणाम होणार नाही.
नव्या माहितीनुसार, नोव्हेंबरचा हप्ता उशिरा मिळाल्यास नोव्हेंबर + डिसेंबर असे दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये पुढील महिन्यात एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी बहिणींसाठी हा खरा ‘डबल गिफ्ट’ ठरू शकतो.
ई-केवायसी न केल्यास लाभ बंद-
शासनाने सूचित केले आहे की जर पात्र महिलांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी पूर्ण केले नाही तर पुढील हप्ते रोखले जाऊ शकतात. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर जवळच्या सुविधा केंद्रात किंवा ऑनलाईन माध्यमातून ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.









