नागपूर – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘लाडकी बहीण’ योजनेचा मुद्दा पुन्हा एकदा प्रचंड गाजला. महिला अत्याचारांच्या चर्चेदरम्यान महाविकास आघाडीच्या आमदारांनी या योजनेचा संदर्भ दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत फटकारलं.
मात्र त्यानंतर अगदी सत्ताधारी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे जवळचे मानले जाणारे अभिमन्यू पवार यांनी अवैध दारूविक्रीच्या प्रश्नावर बोलताना पुन्हा ‘लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख केला, आणि यावर मुख्यमंत्र्यांचा राग अनावर झाला.
पवार म्हणाले, “लाडक्या बहिणींची आपण सतत चर्चा करतो, पण अवैध दारू विक्रीमुळे या महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. सरकारने तातडीने कारवाई करावी,” अशी ठाम मागणी केली.
यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “प्रत्येक विषयाशी ‘लाडकी बहीण’ जोडू नका. या योजनेविरोधात जाऊ नका… नाहीतर घरी बसावं लागेल,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
विरोधकांनाही सुनावले –
महिला सुरक्षेविषयी चर्चेतही काही आमदारांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा संदर्भ दिला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ही योजना फक्त महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे. प्रत्येक सामाजिक प्रश्नात तिचा उल्लेख करणे योग्य नाही.
“अडीच कोटी लाडक्या बहिणींनी ही योजना स्वीकारली आहे. केवायसी न झालेल्यांचे पैसे रोखले नाहीत; प्रक्रिया पूर्ण होताच निधी खात्यात जमा होईल,” अशी माहिती त्यांनी दिली.
महिला सुरक्षेसाठी ‘शक्ती कायद्यातील’ अनेक तरतुदी नव्या तीन केंद्रीय कायद्यात समाविष्ट झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सातारा आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका-
फलटण येथील सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा मुद्दा आमदार अमित साटम यांनी मांडला. तपासात विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,चौकशीसाठी महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र समिती नेमली आहे. व्हॉट्सअॅप चॅट, सीसीटीव्ही फुटेजसह सर्व पुरावे तपासले जात आहेत. नवीन कायद्याप्रमाणे फॉरेन्सिक पुराव्यांचे संकलनही पूर्ण झाले आहे. ६० दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाईल,” असे त्यांनी सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले, “या प्रकरणाला काही जणांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, पण चौकशी संपूर्ण पारदर्शकतेने होत आहे. डॉक्टर कंत्राटी पद्धतीने काम करत होत्या; त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याबाबत सरकार कटिबद्ध आहे,” अशी हमीही त्यांनी दिली.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





