Published On : Fri, Sep 8th, 2017

वाडीत ठिक ठिकानी जलवाहीण्या फुटल्याने शेकडो लिटर स्वच्छ पाण्याची नासाडी

नागपुर /वाडी(अंबाझरी) : वाडी, दत्तवाडी परिसरात नागरीकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व वितरण करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत वेणा जल वितरण केंद्राची आहे. हे शुद्ध पाणी फक्त परिसरातील काही नगरातील घरांना उपलब्ध होते तर ज्यांना हे पाणी मिळत नाही ते पहाटेपासून दत्तवाडी वळनावरील सार्वजनीक नळावर येऊन श्रमाने पाणी घेऊन जातात. शुद्ध पाण्याचे एवढे महत्व नागरिकांना आहे मात्र जलवितरण व्यवस्थेशी संबधीत वेणा विभाग व वाडी न प ला याची जान दिसून येत नाही. कारण परिसरात काही ठिकाणी जलवाहीण्या फुटून गत८ दिवसापासून हजारो लिटर स्वच्छ पाणी वाया जात आहे.

माहीती असूनही युध्द स्तरावर या जलवाहीण्याची दुरुस्ती करण्यात आली नाही यामुळे नागरिकांत तिव्र असंतोष बघावयास मिळत आहे. खडगांव वळणावरील टाईल्स गोडाऊन समोर मोठा पाईपच फुटल्याने दररोज सकाळी संध्याकाळी शेकडो लिटर स्वच्छ पाणी रस्त्यावर पसरून तलाव सदृष्य चित्र बघायला मिळत आहे हा रस्ता अत्यंत वर्दळीचा व बस थांबा असल्याने नागरिक हे उघडया डोळयांनी पान्याची नासाडी पाहत आहे .

सुरक्षा नगर ते गजानन सोसायटी मार्गावर महाभारत किराणा स्टोर्स जवळ तर गजानन सोसायटी येथे अनिल वस्त्रालया समोर गत ७ दिवसापासून जलवाहीणी फुटल्याने येथेही स्वच्छ पाणी वाया जात आहे या संदर्भात वेणाच्या संबधीत अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिल्यावर तातडीने २ दिवसात सर्व लिकेज दुरुस्त करण्याची माहीती प्रसार माध्यमांना दिली.वेना कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली असता त्याना लीकेज कुठे आहे हे अदयाप समजलेले दिसून येत नाही.

मग पानी कुठून निघत आहे हे शोधन्याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न आता नागरिकांनी केला आहे,या मुळे अनेक नगरात पानी वितरनात अडथळे निर्माण झाले आहे,नप व् वेना विभागाने संयुक्त कार्यवाही करुन् ही जलगळती थांबविने गरजेचे आहे.