Advertisement
नागपूर: सोनेगाव पोलिस ठाणे हद्दीत बांधकाम मजूरी करणाऱ्या चौघांमध्ये चिकन पार्टीवरून झालेल्या वादात एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
लम्बु उर्फ शिवम (३०) असे मृत मजूराचे नाव आहे. तर जितेंद्र बाळाराम रावटे (३५) रा. गाव विटाल, तह. राजनांदगाव (छत्तीसगड), अखिलेश धोंडुलाल सहारे (२८) रा. अट्टाकोड, शिवनी, जि. बालाघाट, दिपक असे तिन्ही आरोपींचे नाव आहे.
चिकन शिजवण्याची तयारी सुरू असतांनाच तिघांचा चवथ्या मजूरासोबत वाद झाला.
राग अनावर झाल्याने तिघांनी दगडाने ठेचून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोनेगात पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक दीपक नावाचा आरोपी फरार झाला आहे.