Published On : Thu, Jan 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

कुणाल, सरोज लाल माती कुस्तीत अव्वल खासदार क्रीडा महोत्सव लाल माती कुस्ती स्पर्धा

Advertisement

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील लाल मातीतील कुस्ती स्पर्धेमध्ये रामटेक येथील कुणाल माहुर्ले आणि मौदा येथील सरोज देशमुख यांनी आपापल्या गटात बाजी मारुन जेतेपदाचा खिताब पटकाविला.

महाल येथील चिटणीस पार्कमध्ये झालेल्या लाल मातीतील कुस्ती स्पर्धेत एकूण १३३ मल्लांनी सहभाग नोंदविला. ४५ किलो वजनगटातील अंतिम लढत कुणाल मोहुर्ले आणि प्रिंस दमाहे या रामटेकच्या कुस्तीपटूंमध्ये झाली. यामध्ये कुणालने प्रिंसला मात देत विजेतेपदाचा मान मिळविला. ४८ किलो वजनगटात मौदा येथील सरोज देशमुखकडून नागपूरच्या पीयूष बक्सरेला पराभव स्वीकारावा लागला.

अन्य वजनगटामध्ये देवकुमार बक्सरे, अर्जुन चव्हाण, अरुण ढेंबरे, अजय रहाटे, रुपेश कनोजे यांनी विजय मिळविला.

राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. विजेत्यांना नागपूर जिल्हा मल्लविद्या ऑर्गनायजेशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश दुबळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी हेमंत डोणगावकर, चंद्रशेखर जाधव, बंडू राउत, संजय बालपांडे, अरुण बुटे, श्याम फाळके, अनील आदमने आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.