Published On : Fri, Apr 5th, 2019

कृपाल तुमाने यांचा नागपूर ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रचाराचा झंझावत

Advertisement

गेल्या 5 वर्षांमध्ये रामटेक लोकसभा क्षेत्राचा सर्वाधिक विकास – कृपाल तुमाने

नागपूर: भाजप- रिपाई-बरिएम-रासप महायुतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांनी शुक्रवारी नागपूर ग्रामीण क्षेत्राचा प्रचार दौरा केला. प्रचार दौऱ्यामध्ये भर उनामध्ये नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद बघायला मिळाला.

गेल्या पाच वर्षात रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये विविध मोठे प्रकल्प आलेले असून मिहान मध्ये टीसीएस, एच सी एल ,स्मार्ट डेटा, सारख्या मोठ्या आय टी कंपनी सुद्धा सुरू झालेल्या आहे.

स्थानिकांना यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून लवकरच NIMZ (नैशनल इन्व्हेस्टमेंट मैनीफेक्चरिंग झोन)कुही आणि उमरेड येथे सुरू होणार असून यामध्ये 60 हजार प्रत्यक्ष आणि 2 लाख अप्रत्यक्ष लोकांना रोजगार मिळणार आहे.. राष्ट्रीय महामार्गाचे मोठे जाळे रामटेक लोकसभा क्षेत्रात झालेले असून हजारो कोटी रुपयांचे रस्त्याचे कामे भाजप शिवसेना सरकार पूर्ण करीत आहे.. नागपूर मेट्रो चा विस्तार ग्रामीण भागापर्यंत झालेला असून त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे..

आजच्या दौऱ्यामध्ये कृपाल तुमाने यांनी मध्ये खरबी, बहादुरा,गोनही सिम, विहिरगाव, उमरगाव, कळमना, हुडकेश्वर, बेसा, बेलतरोडी, धामना, चिकना, सालइ गोधणी, कालडोंगरी, वानवडी, रुई, गवसी,जामठा, डोंगरगाव, खापरी रेल्वे, खापरी ,शंकरपूर, वेळा हरी, घोगली ,पिपला, नरसाळा या गावांचा दौरा केला.

यावेळी डॉ राजीव पोतदार, संदीप इटकेलवार, राजू हरणे, रुपराव शिंगणे,अजय बोढारे,भगवान मेंढे, लीना हाथीबेड, मसराम ताई, दीपक मुळे, नरेश भोयर, अंजुषा ताई बोधनकर, विठ्ठल जुमडे, मनीषा इंगळे, सुनील इंगळे, अंकुश मेश्राम, रिषभ जैन, डॉ रवींद्र हावरे तसेच शिवसेना ,भाजप चे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.