Published On : Fri, Apr 12th, 2019

तापनगरचा पंचशील बुद्धविहार मध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई ‘ एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण

नागपूर : प्रतापनगरचा पंचशील बुद्धविहार मध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठ,नागपूरच्या वसतिगृह अधीक्षिका श्रीमती नेहा ठोंबरे यांनी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई ‘ एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण केले. यावेळी मोठ्या संखेत स्त्री पुरुष व विद्यार्थी उपस्थित होते.

भारतातील स्त्री-शिक्षणाचा पाया रचणा-या क्रांतीज्योती ज्योतीराव फुले आणी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनप्रवासाचे या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून नेहा ठोंबरे यांनी विविध पैलू उपस्थितांसमोर मांडले. आतापर्यंत नागपूर व इतर जिल्ह्यात विविध समाजसेवी संघटनेच्या वतीने आयोजित आठ कार्यक्रमांमध्ये या प्रयोगाचे सादरीकरण झाले आहे.

प्रतापनगरचा पंचशील बुद्धविहार येथे ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई ‘ एकपात्री प्रयोगाचे सादरीकरणाप्रसंगी विहार समितीमधील प्रमोद ठोंबरे, वंदना ढोणे, पौर्णिमा ताल्वारे यांनी नेहा ठोंबरे यांचा सत्कार केला व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.