Published On : Tue, Jan 11th, 2022

KP चा हाल्फ टमाटा -चना – पोहा

Advertisement

वर्ष होते १९९९ नुकताच लोकमत समूहात ला पत्रकार म्हणून रुजू झालो होतो आणि मला संपादकांनी आदेश दिला आला “फूड स्टॉप” नावाचे सदर सुरु करतोय तर तुम्ही कोणाची तरी मुलाखत घेऊन या.

मी पत्रकार जरी असलो तरी फूड ह्या विषयावर लिहिणे किंवा मुलाखत घेणे म्हणजे कठीणच काम होते . फूड म्हणजे खाणे हा एवढाच आपला संबंध ह्या क्षेत्राशी …आपण खवय्ये तेव्हा आणि आताही …

आताशी तर सोशल मीडिया वर जो तो फूडी , फूड ब्लॉगर म्हणून समोर येत आहेत ….ओह भाई साहब क्या बनाया म्हणून विडिओ शेयर करत आहेत ..अमूल बुट्टर टाकत आहेत …असो…काही अपवाद आहेत ..ते माझे मित्र आहेत ….

मुलाखत कोणाची घ्यावी ह्या विचारात होतो ….तेव्हा मित्र राजू पोटे म्हणाला…बे रुपम भाई का क्यू नाही लेता …?

रुपम भाई म्हणजे रुपम पोहेवाला @ कस्तुरचंद पार्क …LIC चौक ….आम्ही कॉलेज मध्ये असताना बरेच वेळा सायकल वारी केली आहे तेव्हा सकाळचा नाश्ता पॉईंट हा पोहेवाला ठरलेला असे. रुपम पोहे वाला ह्यांचे अर्धा टमाटर -चणा रस्सा -पोहा त्याकाळी खूप नावाजलेले होते . आम्ही सर्व मित्र नित्यनेमाने ह्या पोह्यांचा आस्वाद घ्यायला जात होतो …प्रताप नगर-धरमपेठ कॉलेज-कस्तुरचंद पार्क व सायकल. त्या पोह्याची आणि रस्सा ची चव जिभेवर तर रेंगाळत होतीच …आमची कॉलेज जिवंनातील कैक वेळेची भूक कमी पैस्यात भागविली होती ह्या माणसाने …..पण आता वेळ आली होती ती लिखाणाद्वारे प्रत्यक्षात उतरवायला…परत फेड करण्याची

बरं रुपम भाऊ म्हणजे रुपम साखरे ह्यांच्या बाबत तेव्हा खूप चर्चा असायची…ते ५/६ पोते पोहे दररोज बनवितात, करोडपती पोहेवाले आहेत ….वर्षातून एकदा परिवाराला विदेश दौरा करवितात …वगैरे वगैरे …

मग एक दिवस शनिवारी मी आणि माझा दिवंगत मित्र राजूभाऊ पोटे (लोकमत LenseMan) आम्ही दोघे गेलो रुपम भाऊ ला भेटायला कस्तुरचंद पार्क ला ….भाऊ ..खाकी ड्रेस मध्ये प्रचंड गर्दी मध्ये अगदी लीलया पद्धतीने पोह्याची प्लेट ग्राहकाकडे सरकवीत होता.. ….मधेच कोणीतरी म्हणायचं… भाऊ रस्सा …भाऊ …चणा …तर भाऊ ते पण सर्व करायचा…अर्थात जसे आपले बाजीप्रभू पावनखिंडी मध्ये दोन हातात… दोन तलवारी घेऊन वेळी शेकडो गनिमाशी लढले होते ….तसाच रुपम भाऊ एकाच वेळी ५०/६० ग्राहक सांभाळत होता ..आणि इतर ग्राहक लाईन लावून उभेच होते ….
राजूभाऊ पोटे ने रुपम भाऊ ची ओळख करून दिली ….रूपंम म्हणाले ..पयले पोहे खा ..अर्धा टमाटा-चना -पोहा …मंग खाता खाता -बोलता बोलता- मुलाखत लो. त्यावेळेस रुपम पोहेवाला हेच नाव होते रुपम तर्री -पोहेवाला नाही…

असो…आमची मुलाखत झाली …मी पोहे आणि छान रस्सा आणि अर्धा टमाटा ह्याबाबत जास्ती लक्ष दिले ….फक्त बोलता बोलता भाऊ मला म्हणलं कि मी नियमित income टँक्स भरतो …..बाकी मी काही विचारले नाही ..दुसऱ्या दिवशी लोकमत मध्ये प्रकाशित झाली आणि रुपम भाऊ ..जो आधीच फेमस होता तोच आणखी फेमस झाला ……मुख्य म्हणजे माझा जवळचा मित्र झाला …

त्यानंतर जेव्हा जेव्हा पोहे खायला गेलो …भाऊ पैसे घेत नसे मला जबरदस्ती द्यावे लागत …मी एकदा म्हटले …अब मै नाही आऊंगा …आप पैसे नाही लेते ….आणि तसेच झालेही …मी बरेच वर्ष फिरकलोच नाही…कामामुळे म्हणा की इतर व्यस्ततेमुळे म्हणा ..

२००९ ला जेव्हा नागपूर महानगर पालिके ने कस्तुरचंद पार्क मधील अतिक्रमण हटविले …तेव्हा मी पुन्हा गेलो …५ वर्षानंतर …आता मी टाइम्स ऑफ इंडियाला होतो …भाऊ ची पुन्हा भेट झाली …तो निराश झाला होता मनपा च्या कार्यवाहीने …आता त्याच्या सोबत इतर लोकांनी देखील पोह्याची दुकाने टाकलेली होती ….मी टाइम्स ला बातमी केली …नंतर पुन्हा दुकाने आली …बऱ्याचवेळा जाणे व्हायचे नाही पण रुपम भाऊ शी फोन वर संपर्क राहिला ..मी संदेश पाठवायचो ..वेळ मिळाला तर तोच फोन करायचा …सचिन भाऊ आओ ना यार पोहे खाणे ….

२०१७ साली महानगर पालिकेच्या कारवाई नंतर भाऊ ने चार दशक चाललेला व्यवसाय बंद केला …निवृत्ती घेतली म्हटले तरी चालेल…

पण एक गोष्ट Trust करावी लागेल …*नव्या पिढीला देखील …के पी चा हाल्फ टमाटा -चना -पोहा होता ….तर्री पोहा नाही…आम्ही त्याला रस्सा मागायचो …तर्री नाही ….हा तर्री -पोहा शब्द आता २०१७ नंतर रूपंम भाऊ ने ठेला बंद केल्यानंतर प्रचलित झाला असावा* अथवा व्यावसायिक लोकांनी प्रचलित केला असावा …असो

रुपम भाऊ….रुपम साखरे We will Miss You & KP चा हाल्फ टमाटा -चना -पोहे

Tribute By Sachin Dravekar