Published On : Sun, Apr 19th, 2020

दवलामेटी टोली येथे कोविद 19 “कंटाईनमेंट प्लॅन” प्रशिक्षण सम्पन्न

Advertisement

*एक पर्यवेक्षक 500 कुटुंबाची माहिती अद्यावत ठेवणार
* एक सर्वेअर दररोज 50 कुटुंबाची भेट घेणार
*सोशल डिस्टन्स व मास्क, सॅनिटायजरचा वापर करून प्रशिक्षणात खबरदारी

ग्राम पंचायत,दवलामेटी टोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र,व्याहाड अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत मधील नागरिकांच्या कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना व प्रत्येक कुटुंबापर्यंत सम्पर्क ठेवून आरोग्य विभागाला दैनंदिन माहिती पुरविण्यासाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका इत्यादींचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

प्रशिक्षणाला पं स नागपूरचे गट विकास अधिकारी किरण कोवे, व्याहाड प्रा आ केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ वैद्य यांनी कंटाईनमेंट प्लॅन बद्दल सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

नागपूर ग्रा तालुक्यात एकही कोरोना संशयित व्यक्ती आढळून आलेला नसून फक्त 29 व्यक्ती परदेशात जाऊन आलेले असून त्यांना होम क्वारंटाईन केले असल्याची माहिती गट विकास अधिकारी किरण कोवे यांनी दिली.

प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजनासाठी ग्राम विकास अधिकारी विष्णू पोटभरे, विस्तार अधिकारी (पंचायत) कुहिटे, सुखदेवे इत्यादींनी परिश्रम घेतले.