Published On : Sat, Nov 18th, 2017

कोपर्डी बलात्कार प्रकरणी ३ आरोपी दोषी

अहमदनगर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असेलल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आला आहे. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे.

आता येत्या 21 तारखेला शिक्षेची सुनावणी होणार आहे.  त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता 21 नोव्हेंबरला होणार आहे.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सकाळी 11 च्या सुमारास न्यायालयात दाखल झाले . याशिवाय तीनही आरोपीही कोर्टात हजर होते.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि तिन्ही आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालय आज कोणती शिक्षा सुनावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान न्यायालयात आज तीनही आरोपींवरील दोष सिद्ध झाले आहेत.