Published On : Tue, Mar 17th, 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोराडी मंदिर दर्शनासाठी बंद

Advertisement

नागपूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आला. शासनाने 13 मार्च रोजी लागू केलेल्या अधिसूचनेनुसार व जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार आज (दिनांक 17 मार्च) रात्री आरतीनंतर कोराडी जगदंबा देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात येत आहे. शासनाच्या पुढील आदेशापर्यंत मंदिर बंद राहणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करू नये. तसेच 25 मार्चपासून सुरू होणार्‍या चैत्र नवरात्र महोत्सवात कोराडी मंदिरात मोठ्या प्रमाणावर होणारी भाविकांची गर्दी पाहता, तसेच राज्यात जमावबंदी कायदा लागू करण्यात आल्यामुळे श्री. महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथील कोराडी मंदिर हे पुढील आदेशापर्यंत दर्शनासाठी बंद करण्यात येत आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान या कालावधीत महालक्ष्मी जगदंबा मातेची नियमित होणारी पूजा, आरती, होम हवन करण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मंदिरातील पुजारी व कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझर देण्यात आले आहेत. तसेच मंदिर परिसरात स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्यात येत आहे. भाविकांनी पुढील आदेशापर्यंत दर्शनासाठी येणे टाळावे असे विश्वस्त मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.