Published On : Sun, May 15th, 2022

खासदार क्रीडा महोत्सव २०२२: सायकलिंग स्पर्धेत दिगंत बापट, संजना जोशी अव्वल

Advertisement

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत रविवारी (१५ मे) झालेल्या सायकलिंग स्पर्धेत दिगंत बापट आणि संजना जोशी यांनी १८ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला. १५ किमी अंतराच्या शर्यतीत दिगंतने २९ मिनिट ५० सेकंद अशी वेळ नोंदवित बाजी मारली. तर संजनाने २४ मिनिट १० सेकंदात १२ किमी अंतर पूर्ण करीत स्पर्धा जिंकली.

याशिवाय १५ वर्षाखालील गटात मुलांच्या १२ किमी अंतराच्या स्पर्धेत दिविजेश साहू (२३ मिनिट ४८ सेकंद) आणि मुलींच्या ८ किमी अंतराच्या स्पर्धेत आदित्री परासिया (१४ मिनिट २७ सेकंद) ने प्रथम क्रमांक पटकाविला. १२ वर्षाखालील मुलांच्या ८ किमी अंतराच्या स्पर्धेत देव नन्नावरे (१७ मिनिट ०२ सेकंद) आणि मुलींच्या ५ किमी अंतराच्या स्पर्धेत श्रीजा वानखेडे (१४ मिनिट ४१ सेकंद) हिने पहिले स्थान पटकाविले.

Advertisement

दीक्षाभूमी येथून रेंडोनियर सायकलपटू श्री. समीर लोही यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविली. सुप्रसिद्ध शेफ श्री. विष्णु मनोहर, डॉ. रोहिनी पाटील, डॉ. सुरेश चारी, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी आदींच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

१८ वर्षाखालील मुलांच्या १५ किमी अंतराची स्पर्धा २९ मिनिट ५० सेकंदात पूर्ण करून आर.एस. मुंडले स्कूलच्या दिगंत बापट याने पहिला क्रमांक पटकाविला. मॉर्डन स्कूलच्या धृव मिश्राने ३० मिनिट १७ सेकंदासह दुसरे आणि त्यापाठोपाठच ३० मिनिट ५८ सेकंदाची वेळ नोंदवित सेंट झेव्हियर्सच्या अक्षत कुमारने तिसरे स्थान प्राप्त केले. वृषभ पाटील (३१ मिनिट) ला चवथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

१८ वर्षाखालील मुलींसाठी १२ किमी अंतराची स्पर्धा झाली. यामध्ये संजना जोशी हिने सर्वात कमी २४ मिनिट १० सेकंद वेळ नोंदवित प्रथम क्रमांक प्राप्त केला. विद्या लोही हिने २६ मिनिट ५५ सेकंदाच्या वेळेसह दुसरे स्थान तर मुस्कान बानोडे ने २९ मिनिटांसह तिसरे आणि ३१ मिनिट ३५ सेकंदाची वेळ नोंदवित रिया पांडे ने चवथे स्थान प्राप्त केले.

दोन्ही गटातून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणा-या सायकलपटूंना प्रत्येकी ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी ९ हजार रुपये, तिसरे स्थान प्राप्त करणा-यांना प्रत्येकी ७ हजार रुपये, चवथ्या क्रमांकाला प्रत्येकी ५ हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय मुले आणि मुलींच्या दोन्ही गटातून १० सायकलपटूंना प्रत्येकी १ हजार रुपयांचे प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले.

१५ वर्षाखालील मुलांसाठी झालेल्या १२ किमी अंतराच्या शर्यतीत दिल्ली पब्लिक स्कूलचा दिविजेश साहू (२३ मिनिट ४८ सेकंद) पहिला आला. २५ मिनिट ३६ सेकंद वेळेसह सोमलवार हायस्कूलचा निलय राऊत दुसरा आणि त्यापाठोपाठ २५ मिनिट ४७ सेकंदासह आर.एस. मुंडले हायस्कूलचा अर्जुन तिवारी तिसऱ्या स्थानी राहिला. सोमलवार हायस्कूलच्या अथर्व माकोडे (२८ मिनिट २० सेकंद) ने चवथे आणि चिन्मय तापस (२८ मि.२१ से.) याने पाचवे स्थान प्राप्त केले.

१५ वर्षाखालील मुलींसाठी झालेल्या ८ किमी अंतराच्या स्पर्धेत १४ मिनिट २७ सेकंद वेळ नोंदवित डीपीएस लावा ची वि‌द्यार्थिनी आदित्री परासियाने प्रथम क्रमांक पटकाविला. १४ मिनिट ३८ सेकंद वेळेसह सरस्वती विद्यालयाची तृप्ती वाडकर हिने दुसरे आणि १८ मिनिट ३२ सेकंदासह सक्षम येथील भ्रमरी पारडे ने तिसरे स्थान प्राप्त केले. प्रेरणा कॉन्व्हेंट ची भक्ती चौधरी (१८ मिनिट ३३ सेकंद) ने चवथे आणि आशू नानवटे (१९ मि.१९से.) ने पाचवे स्थान प्राप्त केले.

मुले आणि मुलींच्या दोन्ही गटातील पहिले स्थान प्राप्त करणाऱ्या सायकलपटूंना प्रत्येकी ८ हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकाला प्रत्येकी ६ हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी ४ हजार रुपये तर चवथ्या आणि पाचव्या क्रमांकाला अनुक्रमे प्रत्येकी ३ हजार आणि ४ हजार रुपये रोख पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मुले आणि मुलींच्या दोन्ही गटातून १० सायकलपटूंना प्रत्येकी १ हजार रुपयांचे प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले.

१२ वर्षाखालील मुलांच्या ८ किमी अंतराच्या स्पर्धेत देव नन्नावरे (१७ मिनिट ०२ सेकंद) याने पहिले स्थान पटकावित बाजी मारली. दुसऱ्या स्थानावर मोहित बोदेकर (१७ मिनिट ३० सेकंद) राहिला. हितेश मेश्राम (१७ मिनिट ४० सेकंद) ने तिसरे स्थान प्राप्त केले. प्रणय सावरकर (१७ मिनिट ४५ सेकंद) ला चवथ्या आणि यशवर्धन सिंग (१८ मिनिट ०३ सेकंद) ला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

मुलींच्या ५ किमी अंतराच्या स्पर्धेत श्रीजा वानखेडे (१४ मिनिट ४१ सेकंद) हिने पहिले स्थान पटकावित बाजी मारली. श्रद्धा कडू (१५ मिनिट २४ सेकंद) हिने दुसरे व लताशा ढोले (१५ मिनिट ५५ सेकंद) हिने तिसरे स्थान प्राप्त केले. मृण्मयी अनिवाल (१६ मिनिट ४५ सेकंद) ला चवथ्या आणि आदित्री ठावरे (१६ मिनिट ४६ सेकंद) ला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या मुले आणि मुलींना प्रत्येकी ५ हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकाला प्रत्येकी ४ हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी ३ हजार रुपये, चवथ्या क्रमांकासाठी २ हजार रुपये आणि पाचव्या क्रमांवरील स्पर्धकाला १ हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. दोन्ही गटातील १० स्पर्धकांना प्रत्येकी ५०० रुपये प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले.

स्पर्धेत शेवटी सर्वांसाठी ‘फन रेस’ घेण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वतीसाठी डॉ. पद्माकर चारमोडे, अशफाक शेख, सचिन देशमुख, प्रिया भोरे, पंकज करपे, अरुण कपुरे, नंदलाल यादव, जयंत जिचकार, रमेश मंडल, शिल्पा कुकडे, मंजुषा पाचपौर, पुजा गुप्ता, आशिष पाठक आदींनी सहकार्य केले.
संक्षिप्त निकाल (अनुक्रमे क्रमांक १ ते १०)

वयोगट

१८ वर्षाखालील मुले : दिगंत बापट (२९ मि.५० से.), धृव मिश्रा (३० मि.१७ से.), अक्षत कुमार (३० मि.५८ से.), वृषभ पाटील (३१ मि.), तेजस बनकर (३१ मि.१७ से.), राज मडावी (३१ मि.४६ से.), भावेश देशमुख (३१ मि.४९ से.), आदित्य रोडे (३१ मि.५० से.), अश्विन खोब्रागडे (३१ मि.५१ से.), मिनेश खांडेकर (३१ मि.५१ से.) १८ वर्षाखालील मुली : संजना जोशी (२४ मि.१० से.), विद्या लोही (२६ मि.५५ से.), मुस्कान बानोडे (२९ मि.), रिया पांडे (३१ मि.३५ से.), जान्हवी करू (३१ मि.४१ से.), मोनिका परिहार (३१ मि.४८ से.), रिधिका पारखी (३१ मि.५१ से.), खुशी रामटेके (३३ मि.२२ से.), रिया पांडवकर (३३ मि.२३ से.), वैदेही बाहे (३३ मि.५४ से.).

१५ वर्षाखालील मुले : दिविजेश साहू (२३ मि. ४८से.), निलय राऊत (२५ मि. ३६से.), अर्जुन तिवारी (२५ मि. ४७से.), अथर्व माकोडे (२८ मि. २०से.), चिन्मय तापस (२८ मि.२१ से.), रोहन दिवारकर (२८ मि. २५से.), ओजस मोझारकर (२८ मि. २६से.), साई गडपायले (२८ मि. २७से.), आशुतोष मल्लेवार (२८ मि. ४६से.), त्रिविक सरकार (२८ मि. ४८से.). १५ वर्षाखालील मुली : आदित्री परासिया (१४ मि. २७से.), तृप्ती वाडकर (१४ मि. ३८से.), भ्रमरी पारडे (१८ मि. ३२से.), भक्ती चौधरी (१८ मि. ३३से.), आशू नानवटे (१९ मि. १९से.), कल्याणी घोडमारे (१९ मि. ४८से.), रिया कुबडे (१९ मि. ४९से.), निष्ठा वंजारी (२० मि. ०२ से.), संयोगिता मिसार (२० मि. २२से.), सई दाणी (२० मि. ५१से.).

१२ वर्षाखालील मुले : देव नन्नावरे (१७ मि. ०२ से.), मोहित बोदेकर (१७ मि. ३० से.), हितेश मेश्राम (१७ मि. ४० से.). प्रणय सावरकर (१७ मि. ४५ से.), यशवर्धन सिंग (१८ मि. ०३ से.), गौतम मुडे (१८ मि. ०८ से.), विश्रृत काडुस्कर (१८ मि. ०९ से.), सोमेश आकरे (१८ मि. २२से.), कुणाल परवार (१८ मि. २६ से.), इशान खांडवे (१८ मि. २७ से.). १२ वर्षाखालील मुली : श्रीजा वानखेडे (१४ मि.४१ से.), श्रद्धा कडू (१५ मि.२४ से.), लताशा ढोले (१५ मि.५५ से.), मृण्मयी अनिवाल (१६ मि.४५ से.). आदित्री ठावरे (१६ मि. ४६ से.), साक्षी सहारे (१६ मि. ४९ से.), पलक दमानीया (१६ मि. ५२से.), साशा खोडे (१६ मि. ५४ से.), आरुषी मुळे (१७ मि. ०२ से.), अरिका विश्वकर्मा (१७ मि. १८ से.).

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement